बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या परिवारातील सदस्यांना कोरोनाची लागण ?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सौरव गांगुलीचा मोठा भाऊ आणि

 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सौरव गांगुलीचा मोठा भाऊ आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव स्नेहाशिष यांच्या कुटुंबातील एका सदस्याला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

स्रेहाशिष यांच्या घरी काम करणारा व्यक्ती हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यामुळे त्याच्या कोरोनाचा संसर्ग स्नेहाशिषची पत्नी आणि त्याच्या सासु-सासऱ्यांना झाल्याचं सांगितलं जात आहे.  दरम्यान, स्नेहाशिष याचा अहवाल मात्र निगेटीव्ह आला आहे. तसेच सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.