भारताचा क्रिकेटपटू रविंद्र जाडेजा याच्या कामगिरीबाबत गौतम गंभीरचं मोठं विधान

भारतीय संघाच्या कामगिरीत गेल्या काही वर्षांपासून चांगल्या पद्धतीने बदल होत आहे. तसेच भारताला विराट कोहली, रविंद्र जाडेजा, मनिष पांडे आणि अजिंक्य रहाणे यांसारखे उत्तम खेळाडू टीम इंडियाला लाभले आहेत.

भारतीय संघाच्या कामगिरीत गेल्या काही वर्षांपासून चांगल्या पद्धतीने बदल होत आहे. तसेच भारताला विराट कोहली, रविंद्र जाडेजा, मनिष पांडे आणि अजिंक्य रहाणे यांसारखे उत्तम खेळाडू टीम इंडियाला लाभले आहेत. परंतु रविंद्र जाडेजा हा एक वेगवान आणि आक्रमक फलंदाज, तसेच फिरकी गोलंदाजी, त्याचप्रमाणे मैदानामध्ये चपळ क्षेत्ररक्षण करणे यासाठी ओळखला जातो. तसेच सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षक असल्याचं भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने म्हटलं आहे. 

आताच्या घडीला जाडेजाइतका सर्वोत्तम क्षेत्ररक्षक कुठेच नाहीये. तो स्लिपमध्ये किंवा गलीमध्ये क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला दिसणार नाही, पण त्याचा थ्रो अजुनही जबरदस्त आहे. त्याच्यासारखा थ्रो अजुनही कोणाला जमत नाही. त्याला क्षेत्ररक्षणासाठी पॉईंटवर ठेवा किंवा कव्हर्समध्ये, त्याच्यासारखी चांगली कामगिरी करणारा क्षेत्ररक्षक कुठेच नाही. याचसाठी मला तो सध्याच्या घडीचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्षेत्ररक्षक वाटतो. असं गौतम गंभीर याने एका मुलाखतीत सांगितले.