श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातील विजयानंतर सेहवागच चहर बद्दलचे ‘हे’ ट्विट होतंय व्हायरल

सेहवागनं द्रविड आणि चहरबद्दल ट्विट करताना महेंद्रसिंह धोनीच्या बायोपिकमधील प्रसंगाचा आधार घेतला आहे. मजेदार ट्विट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या वीरेंद्र सेहवागने यापूर्वीही पहिल्या वन-डे नंतर 'मॅन ऑफ द मॅच' पृथ्वी शॉबद्दलही सेहवागनं असंच एक गंमतीशीर ट्विट केले होते.

    मुंबई: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकास दिवशीय सामन्यामध्ये टीम इंडियानं ३ गडी राखत थरारक विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन वीरेंद्र सेहवागनं (Vireendra Sehwag) या मॅचनंतर एक मजेदार ट्विट केलं आहे.

    सेहवागनं द्रविड आणि चहरबद्दल ट्विट करताना महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) बायोपिकमधील प्रसंगाचा आधार घेतला आहे. धोनीचा खेळ पाहून त्याच्या कोचचं मन भरुन येतं. हा तो प्रसंग आहे. सेहवागनं त्याच प्रसंगाचा फोटो वापरत हे ट्विट केलं असून ते आता चांगलंच व्हायरल झालं आहे.

    त्याच्या मजेदार ट्विट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या वीरेंद्र सेहवागने यापूर्वीही पहिल्या वन-डे नंतर ‘मॅन ऑफ द मॅच’ पृथ्वी शॉबद्दलही सेहवागनं असंच एक गंमतीशीर ट्विट केले होते. पृथ्वी शॉच्या खेळामध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि ब्रायन लारा यांची आठवण येते, असं वक्तव्य टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी केले होते. सेहवागने रविवारी हाच मुद्दा पकडत ट्विट केले होते.

    सेहवागनं त्याचा सचिन आणि लारासह असलेला फोटो शेअर करत ‘पहिल्याओव्हर्स आमचा जलवा होता.’ असं ट्विट केलं. त्याचं ते ट्विट देखील चांगलंच व्हायरल झाले होते.