ICC जाहीर केली कसोटी आणि टी -२० क्रमवारी ; पहा कुठल्या खेळाडूंचा नंबर कोणता

यसीसी कसोटी क्रमवारीमध्ये फलंदाजीत पहिल्या १० मध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र, रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या क्रमवारीत वाढ झाली असून गोलंदाजीमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत.

    आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने आज कसोटी आणि टी -२० क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारत – इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना, बांगलादेश – न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी -२० सामना, श्रीलंका – दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर आयसीसीने अपडेटेड क्रमवारीची घोषणा केली आहे.

    आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये फलंदाजीत पहिल्या १० मध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र, रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या क्रमवारीत वाढ झाली असून गोलंदाजीमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. , जेम्स अँडरसन दोन स्थानांनी घसरला आहे, तर नील वॅग्नर आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी एक स्थान पटकावले आहे. जसप्रीत बुमराह १० व्या स्थानावरून ९ व्या स्थानावर गेला आहे. अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, ख्रिस वोक्सने प्रथम १० मध्ये प्रवेश केला आहे, तर आर अश्विन एक पायरी खाली आला आहे.

    आयसीसी टी -२० रँकिंगमध्ये अव्वल १० फलंदाजांच्या यादीत आरोन फिंच चौथ्या वरून तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे, तर डेव्हन कॉनवे चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. याशिवाय, रुसी व्हॅन डेर ९ व्या स्थानावर पोहोचला आहे, तर मार्टिन गुप्टिल १० व्या स्थानावर घसरला आहे. गोलंदाजीच्या बाबतीत टीम साऊदी आठव्या स्थानावर तो दोन स्थानांनी घसरला आहे. त्याच वेळी, एस्टन एगर आणि अॅडम झांपा प्रत्येकी एक स्थान वर गेले आहेत. त्याचबरोबर शाकीब अल हसनची एंट्री टॉप १० मध्ये झाली असून तो ९ व्या स्थानावर आला आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये, रायन बर्ले सातव्या क्रमांकावर आहे, तर मिशेल मार्श एक पायरी खाली गेला आहे. झीशान मकसूदने पहिल्या १० अष्टपैलूंमध्ये प्रवेश केला आहे. तो १० व्या क्रमांकावर आहे