‘असे’ झाले तर रवी शास्त्रींच्या प्रशिक्षक कालावधीचा वाढणार?

भारतीय संघाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेनंतरच होणार आहे. त्यामुळे जर संघाची कामगिरी सरस झाली व शास्त्री यांनाही या पदावर आणखी काही काळ राहण्याची इच्छा असेल तर निश्‍चितपणे त्यांना मुदतवाढ दिली जाईल

    नवी दिल्ली: ICC T-20 World Cup स्पर्धेतील भारतीय संघाच्या(Indian cricket team)  यशावरच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री प्रशिक्षक कालावधी वाढवायची की नाही हे ठरवण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या(BCCI) एका सदस्याने दिली आहे. या स्पर्धेनंतर शास्त्री यांचा करार संपत असून तो वाढवण्यास शास्त्री फारसे उत्सुक नसल्याचे बोलले जात असतानाच दुसरीकडे स्पर्धेतील भारतीय संघाच्या उत्कृष्ट कामगिरीवरचाशास्त्रींचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता टिकून आहे. अशी माहिती बीसीसीआयच्या सदस्यहाने दिली आहे.

    अमिराती व ओमान येथे होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेनंतरशास्त्री यांचा प्रशिक्षकांची कालावधी संपुष्टात येत आहे. शास्त्री आपला करार आणखी वाढवण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत असे म्हटले जात आहे. बीसीसीआयने देखील मुख्य प्रशिक्षकांसह सपोर्ट स्टाफमध्ये बदल करण्याचा विचार व्यक्त केला होता.

    मुख्य प्रशिक्षकाबाबतच्या चर्चेवर शास्त्री यांनी यावर अद्याप मत व्यक्‍त केलेले नाही. मात्र, या सदस्याने दिलेल्या माहितीनुसार शास्त्री यांना आणखी एक मुदतवाढ मिळू शकते. भारतीय संघाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेनंतरच होणार आहे. त्यामुळे जर संघाची कामगिरी सरस झाली व शास्त्री यांनाही या पदावर आणखी काही काळ राहण्याची इच्छा असेल तर निश्‍चितपणे त्यांना मुदतवाढ दिली जाईल, असेही या सदस्याने सांगितले.

    श्रीलंकेतील यशस्वी दौऱ्यानंतर राहुल द्रविड यांना संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात येणऩार असल्याचेही बोलले जात होते. मात्र, त्यांनी मुदत संपल्यानंतरही पुन्हा एकदा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालकपदासाठी फेरअर्ज दाखल केला. त्यामुळे त्यांच्या नावावरील चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. तर सपोर्टस्टाफमधील फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्याही नावाची चर्चा सुरु असल्याचे बोलले जात असले तरीही त्याबाबत अद्याप बीसीसीआयने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.