पृथ्वी शॉ का शेन वॉर्न?  लेग स्पिनचा हा व्हिडिओ पाहून तुमचीही विकेट पडेल

पृथ्वी शॉ याने इन्स्टाग्रामवर या बॉलचा व्हिडिओ शेयर केला आहे. कधी कधी अशी गिफ्ट चांगली वाटतात. सुरक्षित हात असलेल्या साहा आणि रहाणेलाही बॉलने चकवा दिला, असं शॉ या पोस्टमध्ये म्हणाला आहे.

यंदाच्या वर्षी झालेल्या आयपीएल  मध्ये पृथ्वी शॉ  अपयशी ठरला. १३ मॅचमध्ये शॉने फक्त २२८ रन केले, यानंतर त्याला दिल्लीच्या टीमने बाहेर बसवलं. यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही पृथ्वी शॉची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. दोन्ही सराव सामन्यात पृथ्वी शॉने बॅटिंगमध्ये छाप पाडली नाही. पण त्याने टाकलेला एक बॉल पाहून सगळेच हैराण झाले.

सराव सामन्यामध्ये दुसरे ओपनर शुभमन गिल आणि मयंक अगरवाल यांनी दुसऱ्या मॅचमध्ये अर्धशतक केलं, तर पृथ्वी शॉला चार इनिंगमध्ये ६२ रन करता आले. यातले ४० रन तर एकाच इनिंगमधले आहेत. त्यामुळे पृथ्वी शॉला पहिल्या टेस्टमध्ये संधी मिळेल का नाही? याबाबत साशंकता आहे. एलन बॉर्डर आणि सुनिल गावसकर यांच्यासारख्या दिग्गजांनी रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये मयंक अगरवाल आणि शुभमन गिल यांनी ओपनिंगला खेळावं, असा सल्ला दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by PRITHVI SHAW (@prithvishaw)

सराव सामन्याच्या चारही इनिंगमध्ये पृथ्वीच्या बॅटमधून रन आले नसले, तरी त्याने बॉलिंगमधून प्रभाव पाडला. पृथ्वी शॉने सराव सामन्यात तीन ओव्हर टाकल्या, यात त्याला एकही विकेट मिळाली नाही, पण त्याने टाकलेला लेग स्पिन बॅट्समन आणि विकेट कीपरलाही चुकवून गेला. मिडल आणि लेग स्टम्पवर पडलेला बॉल ऑफ स्टम्पच्या बाहेर गेला. ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन जॅक विल्डरमुथ यालाही हा बॉल खेळता आला नाही. विकेटकीपर ऋद्धीमान साहा आणि पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या अजिंक्य रहाणे यांच्या मधून शॉने टाकलेला बॉल गेला.

पृथ्वी शॉ याने इन्स्टाग्रामवर या बॉलचा व्हिडिओ शेयर केला आहे. कधी कधी अशी गिफ्ट चांगली वाटतात. सुरक्षित हात असलेल्या साहा आणि रहाणेलाही बॉलने चकवा दिला, असं शॉ या पोस्टमध्ये म्हणाला आहे.