भारत- श्रीलंका एकदिवसीय मर्यादित षटकांच्या मालिकेस आजपासून सुरुवात ; चमकदार कामगिरीसाठी भारतीय संघातील युवा चेहरे तयार

भारताचे २० खेळाडू नियमित टी-२० खेळतात. त्यातील सहा खेळाडू आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नाहीत. प्रत्येकाला संधी मिळणे कठीण असेल,असे द्रविड यांनी स्पष्ट केलेच आहे.

  कोलंबो: आजपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होत असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्याद्वारे मर्यादित षटकांच्या मालिकेत चुणूक दाखविण्यास भारतीय खेळाडू सज्ज आहेत. या संघात अनेक दिग्गज खेळाडूंची कमतरता जाणवत असली तरी जे खेळाडू या दौऱ्यावर आले आहेता ते सामन्यात चमकदार कामगिरी करण्यासाठी तयार आहेत.

  येथे आलेल्या भारतीय संघात अनेक स्टार खेळाडूंची उणीव असली तरी जे दौऱ्यावर आले त्यांच्यात सहा सामन्यात शानदार कामगिरी करण्याची खुमखुमी जाणवते. यजमान संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने दौऱ्याला पाच दिवस उशिरा सुरुवात होत आहे. मालिकेत तीन वन डे आणि तीन टी-२० सामने खेळले जातील. दासून शनाका हा मागील चार वर्षांत राष्ट्रीय संघाचा दहावा कर्णधार असेल. धनंजय डिसिल्व्हा आणि दुष्मंता चामिरा यांचा अपवाद वगळता शिखर धवनच्या संघाला कडवे आव्हान देईल असा एकही खेळाडू यजमान संघात नाही इंग्लंडमधील खराब कामगिरीनंतरही श्रीलंकेने बाजी मारल्यास त्यांच्यासाठी ही मोठी उपलब्धी ठरणार आहे.

  भारताचे २० खेळाडू नियमित टी-२० खेळतात. त्यातील सहा खेळाडू आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नाहीत. प्रत्येकाला संधी मिळणे कठीण असेल,असे द्रविड यांनी स्पष्ट केलेच आहे. ‘आगामी टी-२० विश्वचषकात स्थान मिळवायचे असेल तर हीच संधी आहे,’ या निर्धारासह युवा भारतीय खेळाडू मैदानात उरणार आहेत.

  सामना सुरुवात : दुपारी ३ वाजेपासून (भारतीय वेळेनुसार)

  उभय संघ यातून निवडणार

  भारत: शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, नितीश राणा, ईशान किशन (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक ), हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कृष्णप्पा गौतम, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, चेतन सकारिया, नवदीप सैनी.

  श्रीलंका: दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डिसिल्वा (उपकर्णधार), अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पथुम निसंका, चरित असलंका, वनिन्दु हसरंगा, आशेन बंडारा, मिनोड भानुका, लाहिरु उदारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, लक्षण संदाकन, अकिला धनंजय, शिरन फर्नांडो, धनंजय लक्षण, ईशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रेमा, असिथा फर्नांडो, कासुन रजिता, लाहिरु कुमारा, इसुरु उदाना यांचा समावेश आहे.