India win the series by winning the second T20 match in a row Defeat of Australia

दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिकाही जिंकली आहे. हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यरच्या जोडीने फटकेबाजी करत कांगारुंच्या हातात आलेला विजयाचा घास हिसकावून घेतला.

पहिल्या टी-२० सामन्यात ११ धावांनी बाजी मारल्यानंतर, लागोपाठ दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजांनी धडाकेबाज खेळ करत ६ गडी राखून मालिकाही जिंकली आहे.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शिखर धवन, विराट कोहली आणि मधल्या फळीत हार्दिक-श्रेयस अय्यरच्या जोडीने फटकेबाजी करत या रोमहर्षक सामन्याचं चित्रच बदलून टाकले.

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला १९५ धावांचे टार्गेट दिले होते. भारतीय संघाची सुरुवात आक्रमक झाली. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकाची भागीदारी केली. यानंतर विराटने पुन्हा एकदा जम बसवत भारताच्या डावाला आकार दिला. शिखरने आपली फटकेबाजी सुरु ठेवत अर्धशतक झळकावलं. ३६ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५२ धावांची खेळी केल्यानंतर शिखर बाद झाला. ४० धावांची खेळी केल्यांनतर विराटी तंबूत परतला. यानंतर मैदानावर आलेल्या हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यरने फटकेबाजी करत भारताला विजय मिळवून दिला.