तब्बल सात वर्षानंतर भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीसंतचे क्रिकेटच्या मैदानावर ”कमबॅक”

नवी दिल्ली -आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयकडून दोषी आढळलेला क्रिकेटपटू एस. श्रीसंत आता सात वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर खेळण्यास सज्ज झाला आहे. त्यामुळे त्याला एक मोठा दिलासा मिळाला

नवी दिल्ली – आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयकडून दोषी आढळलेला क्रिकेटपटू एस. श्रीसंत आता सात वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर खेळण्यास सज्ज झाला आहे. त्यामुळे त्याला एक मोठा दिलासा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीसंतनी आपली बाजू मांडल्यानंतर, त्यावर तीन महिन्याच्या आत पुनर्विचार करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयायने बीसीसीआयला १५ मार्च २०१९ रोजी दिले होते. परंतु लोकपाल डी.के.जैन हे श्रीसंतबद्दल निर्णय घेतील असा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. 

त्यानुसार २० ऑगस्ट २०१९ ला श्रीसंतवरील आजीवन बंदी हटवण्यात आली असून त्याला २०२० मध्ये क्रिकेटच्या मैदानावर परतता येणार असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, सप्टेंबरनंतर सुरू होणाऱ्या केरळच्या रणजी संघात ३७ वर्षीय श्रीसंतला समाविष्ट करून घेण्याचा निर्णय राज्य क्रिकेट संघटनेने केला आहे. त्यामुळे तब्बल सात वर्षानंतर भारताचा क्रिकेटपटू  आणि गोलंदाज एस.श्रीसंत आता मैदानावर खेळण्यास सज्ज झाला आहे.