३ गडी राखत भारतीय संघाने घडवला इतिहास ; पाकिस्तानचे रेकॉर्ड मोडत केला जागतिक विक्रम

भारताने ३ एकादिवशीय सामन्यांच्या या सीरिजमध्ये २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. या विजयासह टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विजय मिळवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड भारतीय टीमने केला आहे.

  कोलंबो: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवशीय सामान्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला आहे. या दुसऱ्या एकदिवशीय सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर ३ गडी राखत विजय खेचून आणला आहे. श्रीलंकेने ५० ओव्हरमध्ये ९ गडी गमावून २७५ धावा केल्या. टीम इंडियाने ४९.१ षटकांत ७ गडी गमावून २७६ धावांचे लक्ष्य गाठले.

  भारताने ३ एकादिवशीय सामन्यांच्या या सीरिजमध्ये २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. या विजयासह टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विजय मिळवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड भारतीय टीमने केला आहे. भारताने श्रीलंकेचा एकूण १२६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पराभव केला. याआधी हा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. पाकिस्तानने श्रीलंकेला १२५ मॅचमध्ये धूळ चारली.

  असा रचला इतिहास

  टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध टेस्ट, वनडे आणि टी-२० मिळून २२४ मॅच खेळल्या, यातल्या १२६ मॅचमध्ये भारताचा विजय झाला. श्रीलंकेने ६८ सामन्यांमध्ये भारताचा पराभव केला, तर एक मॅच टाय आणि १७ मॅच ड्रॉ झाल्या.

  पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध २३१ सामने खेळले, यापैकी १२५ मॅचमध्ये पाकिस्तानला विजय मिळवला, म्हणजेच त्यांची विजयी टक्केवारी ५४. ११ एवढी आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध ८२ मॅच गमावल्या, एक मॅच टाय आणि १९ मुकाबले ड्रॉ झाले.

  भारताने श्रीलंकेविरुद्ध एकूण १६१ वनडे खेळल्या, यातल्या ९३ मॅचमध्ये भारताचा विजय झाला, तर ५६ मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला. वनडेमध्ये श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रमही टीम इंडियाच्या नावावर जाला आहे.

  पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक १५५ सामन्यांपैकी ९२ जिंकले. या यादीत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. कांगारू टीमने लंकेविरुद्ध ९७ पैकी ६१ वनडे जिंकल्या. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी ६२ एवढी आहे.

  श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक रन करणाऱ्या टॉप-५ क्रिकेटपटूंमध्ये सध्या खेळत असणारा विराट कोहली हा एकमेव आहे. विराटने ६३ सामन्यांमध्ये ३,५६३ रन केले, यात १३ शतकांचा समावेश आहे. या यादीत सचिन तेंडुलकर ५,१०८ रनसह पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनने श्रीलंकेविरुद्ध १७ शतकं केली होती.