team India

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये(India versus Australia) पहिला टी-२० सामना(t-20) कॅनबेरामध्ये आज खेळला गेला. या सामन्यामध्ये भारताने ११ धावांनी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियासमोर १६२ धावांचे आव्हान असताना १५० धावाच करू शकले. या विजयानंतर भारताने १-० ने आघाडी घेतली आहे. 

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये(India versus Australia) पहिला टी-२० सामना(t-20) कॅनबेरामध्ये आज खेळला गेला. या सामन्यामध्ये भारताने ११ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने २० ओव्हरमध्ये १६१ धावा केल्या. केएल राहुलचे अर्धशतक आणि जडेजाच्या शानदार ४४ धावांची खेळी यामुळे भारताला सामना जिंकण्यात यश मिळाले.

ऑस्ट्रेलियासमोर १६२ धावांचे आव्हान असताना १५० धावाच करू शकले. या विजयानंतर भारताने १-० ने आघाडी घेतली आहे.  ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध चांगली सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. जडेजाच्या जागी सामन्यात आलेल्या चहलने फिंचची विकेट घेतली. तो ३५ धावांवर आऊट झाला. स्मिथलाही १२ धावांवर चहलने आऊट केले. ग्लेन मॅक्सवेलला नटराजनने बाद केले.

नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि सुरुवात खराब झाली. शिखर धवन ६ बॉलमध्ये १ रन काढत धवन आऊट झाला. यानंतर केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात भागीदारी होईल असं वाटत असताना कोहली ९ बॉलमध्ये ९ रन करत आऊट झाला. तिसरी विकेट पडली ती संजू सॅमसनची. त्याने १५ बॉलमध्ये २३ रन केले.

केएल राहुलने  अर्धशतक ठोकले.  मनीष पांडेने ८ बॉलमध्ये फक्त २ रन केले. केएल राहुलच्या रूपात भारताला पाचवा धक्का बसला. ४० बॉलमध्ये त्याने ५१ धावा केल्या. हार्दिक पांड्याने १५ बॉलमध्ये १६ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर ७ धावांवर बाद झाला. जडेजाने ४४ धावांची नाबाद खेळी केली.