smruti mandhana

टीम इंडियाच्या विजयात स्मृती मंधानाने(smruti mandhana) आक्रमक खेळी केली, सोबतच तिने विश्वविक्रमही (world recornd)स्वत:च्या नावावर केला. स्मृतीने ६४ बॉलमध्ये नाबाद ८० रन केले. यात ३ फोर आणि १०सिक्सचा समावेश होता. मंधानाचा स्ट्राईक रेटही १२५ चा होता. तर पूनम राऊतने ८९ बॉलमध्ये नाबाद ६२ रनची खेळी केली.

    लखनौ: भारतीय महिला क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या(India won against South Africa) पहिल्या वनडेत(one day) झालेल्या पराभवाची दुसऱ्या मॅचमध्ये सव्याज परतफेड केली. लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारताने आफ्रिकेवर ९ विकेट्सनी विजय मिळवला.

    या मालिकेतील दुसऱ्या लढतीत विजय मिळून भारताने १-१ अशी बरोबरी केली. या सामन्यात टीम इंडियासमोर विजयासाठी १५८ धावांचे आव्हान होते. सलामीवीर स्मृती मंधानाने नाबाद ८० आणि पूनम राऊतने नाबाद ६२ धावा केल्या. या दोघींच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने हे आव्हान फक्त २८.४ ओव्हरमध्ये एक विकेट गमावून पार केले. भारताकडून झूलन गोस्वामीने ४२ रन देऊन ४ विकेट घेतल्या. तर, राजेश्वरी गायकवाडला ३ विकेट मिळाल्या.

    टीम इंडियाच्या विजयात स्मृती मंधानाने आक्रमक खेळी केली, सोबतच तिने विश्वविक्रमही स्वत:च्या नावावर केला. स्मृतीने ६४ बॉलमध्ये नाबाद ८० रन केले. यात ३ फोर आणि १०सिक्सचा समावेश होता. मंधानाचा स्ट्राईक रेटही १२५ चा होता. तर पूनम राऊतने ८९ बॉलमध्ये नाबाद ६२ रनची खेळी केली.

    मंधानाचे विक्रमी अर्धशतक
    भारताची डावखुरी ओपनिंग बॅट्समन असलेल्या मंधानाने लागोपाठ दहाव्यांदा आव्हानाचा पाठलाग करताना ५० पेक्षा जास्त रन केले आहेत. हा रेकॉर्ड करणारी ती जगातली पहिली क्रिकेटपटू आहे. जागतिक क्रिकेटमध्ये महिलाच नाही तर पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आजवर ही कामगिरी कोणी केली नाही.२०१८ पासून जेव्हा भारताने वनडे क्रिकेटमध्ये आव्हानाचा पाठलाग केला, तेव्हा स्मृतीने ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. दरम्यान, पहिल्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेटने पराभव झाला होता. कोरोना काळानंतर महिला टीमची ती पहिलीच मॅच होती. ३६४ दिवसानंतर भारतीय टीम पहिल्यांदाच मैदानात उतरली होती. आता सीरिजची तिसरी वनडे १२ मार्चला याच मैदानावर खेळविण्यात येणार आहे.