श्रीलंकेविरुद्ध पहिल्या वनडेत भारताचा दणदणीत विजय ; शिखर धवनने मोडले इतके विक्रम

श्रीलंकेवर भारताने श्रीलंकेवर सात विकेट्सने विजय मिळवला आहे. श्रीलंकेने भारतासमोर २६२ धावांचे आव्हान समोर ठेवले होते. हे आव्हान भारताने ३६.४ षटकात ३ विकेट गमावून पूर्ण केले.

  भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेत पहिल्याच दिवशी भारताने सात विकेटसने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळाला आहे . या सामन्याच कर्णधारपद सांभाळत नाबाद ८६ धावा करत माजी कर्णधार सौरव गांगुलीसह आणखी काहीचे विक्रम मोडीत काढला आहेत.

  श्रीलंकेवर भारताने श्रीलंकेवर सात विकेट्सने विजय मिळवला आहे. श्रीलंकेने भारतासमोर २६२ धावांचे आव्हान समोर ठेवले होते. हे आव्हान भारताने ३६.४ षटकात ३ विकेट गमावून पूर्ण केले. भारताचा कर्णधार शिखर धवनने ९५ चेंडूमध्ये नाबाद ८६ धावांची खेळी करत संघाचा विजय सोपा केला. इशान किशन ५९ आणि पृथ्वी शॉ ने ४३ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने नाबाद ३१ धावा केल्या. भारताने हा सामना जिंकत मालिकेत १-० ने आघाडी मिळवली आहे.

  त्यापूर्वी श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेनं ५० षटकात २६२ धावा केल्या. पृथ्वी शॉ (४३ रन,२४ बॉल,९ चौकार), शिखर धवन (नाबाद ८६ रन, ९५ बॉल, ६ चौकार,१ षटकार), ईशान किशन (५९ रन, ४२ बॉल, ८ चौकार, २ षटकार), मनीष पांडे (२५ रन, ४० बॉल, १ चौकार, १ षटकार) आणि सूर्यकुमार यादव (नाबाद ३१ रन, २० बॉल, ५ चौकार) जोरावर हे आव्हान भारताने ३६.४ षटकात ३ विकेट गमावून पूर्ण केले. श्रीलंकेकडून धनंजय सिल्वाने दोन गडी बाद केले. तर भारताकडून दीपक चहर, कुलदीप यादव आणि चहल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. दुसरी वन डे उद्या २० जुलैला खेळवण्यात येणार आहे.

  शिखर धवनने रचला इतिहास

  • धवनने ८६ धावांची खेळी सहा हजार धावाचा टप्पा पूर्ण केला.
  • ६ हजार धावा करणारा तो १३ वा भारतीय खेळाडू बनला.
  • भारताच्या सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, विरेंद्र सहवाग, गौतम गंभीर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, युवराज सिंह, सुरेश रैना आणि मोहम्मद अझहरुद्दीन या नावांचा यादी आता धवनचाही समावेश आहे.