भारताच्या ‘या’ ऑलराऊंडर खेळाडूने क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

स्टुअर्ट बिन्नी हा दिग्गज भारतीय क्रिकेटर रोजर बिन्नी यांचा मुलगा आहे. त्याने ६ टेस्ट, १४ वनडे आणि ३ टी २० मॅच खेळल्या आहेत. त्याच्या नावावर वनडे क्रिकेट मध्ये भारताकडून सर्वश्रेष्ठ गोलंदाजीचा रेकॉर्ड आहे.

    भारताचा ऑलराऊंडर खेळाडू स्टुअर्ट बिन्नी (Stuart Binny) याने आज क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. ३७ वर्षीय स्टुअर्टने सार्‍या फॉर्मेट मधून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले आहे. मागील अनेक महिन्यांपासून टीम पासून दूर होता. २०१६ नंतर त्याने कोणत्याही इंटरनॅशनल सामना खेळला नव्हता. २०१२ साली न्युझिलंड विरूद्ध वनडे मॅच द्वारा त्याने पदार्पण केले होते.

    स्टुअर्ट बिन्नी हा दिग्गज भारतीय क्रिकेटर रोजर बिन्नी यांचा मुलगा आहे. त्याने ६ टेस्ट, १४ वनडे आणि ३ टी २० मॅच खेळल्या आहेत. त्याच्या नावावर वनडे क्रिकेट मध्ये भारताकडून सर्वश्रेष्ठ गोलंदाजीचा रेकॉर्ड आहे. २०१४ मध्ये बांग्लादेश विरूद्ध त्याने ४ रन देऊन ६ विकेट घेतल्या होत्या. त्याचा हा रेकॉर्ड अद्याप कोणताही भारतीय गोलंदाज मोडू शकलेला नाही.

    स्‍टुअर्ट बिन्‍नी आपल्या वडिलांप्रमाणेच लोअर मिडल ऑर्डर मध्ये हार्ड हिटिंग फलंदाज होता. सुरूवातीला बिन्नी कर्नाटकच्या टीममध्ये जागा मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. २००७ साली त्याला भारतीय क्रिकेट लीगसाठी करारबद्ध करण्यात आले. तो हैदराबाद हिरोज आणि इंडिया इलेवन साठी खेळला.