भारत-चीन वादाचा परिणाम आयपीएलवर होण्याची शक्यता?

नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २९ मार्च रोजी सुरू होणार आयपीएल रद्द करण्यात आली होती. तसेच आता आयपीएल सुरू होणार की नाही ? याचा निर्णय अद्याप बीसीसीआयकडून झालेला नाही. परंतु आता भारत

 नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २९ मार्च रोजी सुरू होणारी आयपीएल रद्द करण्यात आली होती. तसेच आता आयपीएल सुरू होणार की नाही ? याचा निर्णय अद्याप बीसीसीआयकडून झालेला नाही. परंतु आता भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमेवरील वादाचा परिणाम हा आयपीएलवर होण्याची शक्यता आहे.  चीनमधील विव्हो कंपनी ही इंडियन प्रीमियर लीगचे शीर्षक आहे. तसेच ही कंपनी स्पर्धेदरम्यान सर्वाधिक जाहिरात करते.

त्याचप्रमाणे चिनी कंपनीने २०१८ मध्ये पाच वर्षांसाठी २१९९ कोटी रूपयांचा करार केला होता. परंतु आयपीएल होणार की नाही, यासंबंधीत निर्णय आणि आयोजन अजून पर्यंत झालेले नाही. त्यामुळे बीसीसीआय विव्होबाबत काय निर्णय घेणार आहे, हे पाहावं लागणार आहे. पण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी अनेकवेळा आयपीएलच्या आयोजनाबाबत सकारात्मक असल्याचं संकेत दिले आहेत. त्यामुळे आयपीएल वर्ल्डकप २०२० होणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.