IPL 2020 :   हैद्राबाद संघाने विजयाचे खाते उघडले

अबुधाबीच्या शेख जाएद स्टेडियमवर (Sheikh Zayed Stadium) दिल्ली कॅपिटलस विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद Sunrisers Hyderabad) सामन्यात हैद्राबाद संघाचा विजय झाला. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या हैद्राबादच्या संघाने दिल्लीसमोर१६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. सनरायझर्स हैदराबादने दिल्लीवर १५ धावांनी मात करत यंदाच्या मोसमातील पहिलाच विजय मिळविला.

दिल्लीविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैद्राबादच्या संघाने २० षटकात ४ बाद १६२ धावा केल्या. जॉनी बेअरस्टोचे अर्धशतक आणि सोबत वॉर्नर, विल्यमसन यांच्या फटकेबाजीची मिळालेली साथ यामुळे हैदराबादच्या संघाने १६० पार मजल मारली. कर्णधार म्हणून आपला ५०वा सामना खेळणाऱ्या वॉर्नरला अर्धशतकाने मात्र हुलकावणी दिली.दिल्लीचा संघ २० षटकात ७ बाद १४७ धावा काढू शकला. दरम्यान, आयपीएलच्या तेराव्या हंगामात सनरायजर्स हैदराबादने आपले दोन्ही सामने गमावले होते.