IPL 2020 : मुंबईची हैद्राबादवर ३४ धावांनी मात

आयपीएलच्या १७ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबादवर ३४ धावांनी मात केली. २०९ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला हैदराबादचा संघ १७४ धावांपर्यंतच मजल मारु शकला.

मुंबईने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही.. कर्णधार रोहित शर्मा लगेचच ६ धाव काढून झेलबाद झाला. सूर्यकुमार यादव आणि क्विंटन डी-कॉक यांच्या जोडीने संघाचा डाव सावरला. सूर्यकुमारने २७ धावा केल्या. यानंतर इशान किशन आणि क्विंटन डी-कॉक जोडीने मुंबई संघाला अपेक्षित धावा दिल्या. दोन्ही फलंदाजांनी ७८ धावांची भागीदारी केल्यामुळे मुंबईचा डाव सावरला.

हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ६० धावांची खेळी करत आक्रमक खेळी केली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही.केन विल्यमसन आणि प्रियम गर्ग झटक्यात बाद झाले . यानंतर अब्दुल समद आणि अभिषेक शर्मा या युवा फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांचे प्रयत्न कमी पडले. मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन आणि जसप्रीत बुमराहने यांनी प्रत्येकी २-२ तर कृणाल पांड्याने एक बळी घेतला.