आयपीएल २०२० भारताबाहेर खेळविणार ?

दिल्ली : आयपीएल नेमके कधी पासून सुरुवात होणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. पण आयपीएलच्या आयोजनात काही अडथळे येत आहेत. आता तर आयपीएल भारताबाहेर खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत असल्याचे समोर आले आहे.

दिल्ली : आयपीएल नेमके कधी पासून सुरुवात होणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. पण आयपीएलच्या आयोजनात काही अडथळे येत आहेत. आता तर आयपीएल भारताबाहेर खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत असल्याचे समोर आले आहे. आयपीएल नेमके कधी पासून सुरुवात होणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. पण आयपीएलच्या आयोजनात काही अडथळे येत आहेत. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाल यांनी खास मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये बीसीसीआय भारताबाहेर आयपीएल खेळवण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण आयपीएल कोणत्या देशात खेळवायची, याबाबत मात्र बीसीसीआयने कोणताही निर्णय घेतलेला नाही. याबाबत धुमाल म्हणाले की, खेळाडूंसाठी भारतामध्ये आयपीएल खेळवणे सुरक्षित असेल तर नक्कीच आम्ही या गोष्टीचा विचार करू. आयपीएल भारतामध्ये खेळवण्याला आमचे प्राधान्य असेल. पण जर परिस्थितीमुळे तसे होऊ शकले नाही, तर आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसेल. त्यावेळी आयपीएल भारताबाहेर खेळवण्याचा विचार आम्ही करू शकतो. त्यामुळे जर भारतात आयपीएल खेळवणे शक्य नसेल तर आम्ही परदेशात ही स्पर्धा आयोजित करण्याचा विचार करत आहोत.