IPL 2021 : आज कोलकत्याचा विजयाचा मार्ग खडतर तर पंजाबला हवाय तिसरा विजय

पंजाब किंग्जसाठी अखेरची लढत महत्त्वाची ठरली. या लढतीत त्यांनी मुंबई इंडियन्सला हरवले होते. या लढतीत कर्णधार लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, ख्रिस गेल व रवी बिश्नोई यांनी धडाकेबाज कामगिरी केली. आता या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी हे खेळाडू उत्सुक असतील. मोहम्मद शमीला मागील लढतीत सूर गवसला असला तरी त्याच्या कामगिरीत सातत्य असायला हवे. मोहम्मद शमी व अर्शदीप सिंग या जोडीवर पंजाब किंग्जच्या गोलंदाजीची मदार आहे.

    आयपीएल -२०२१ च्या आजच्या २१ व्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होईल. दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या कोलकाता नाइट रायडर्सला यंदाच्या आयपीएल मोसमात आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. पाच सामन्यांमधून त्यांना फक्त एकाच लढतीत विजय मिळवता आलेला आहे. कप्तान एन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सचा सामना आज लोकेश राहुलच्या पंजाब किंग्जशी होणार आहे. सध्या तरी कोलकाता नाइट रायडर्सचा मार्ग खडतर दिसत आहे. विजयासाठी हा संघ अहमदाबादमध्ये सर्वस्व पणाला लावेल. मुंबई इंडियन्सला हरवून आत्मविश्वास संपादन करणारा पंजाब किंग्जचा संघ विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करील.

    अहमदाबाद, दिल्लीमध्ये आजपासून लढतींचा धमाका
    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आयपीएलच्या लढती सहा ठिकाणी खेळवण्यात येत आहेत. मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, नवी दिल्ली, बंगळुरू व कोलकाता या सहा ठिकाणी आयपीएलच्या लढती रंगणार आहेत. मुंबई व चेन्नई या दोन ठिकाणी पहिला टप्पा पार पडला. रविवारी या टप्प्यातील अखेरच्या लढती खेळवण्यात आल्या. आजपासून दुसऱया टप्प्याला सुरुवात होणार आहे. अहमदाबाद व नवी दिल्ली येथे या टप्प्यातील लढती होणार आहेत. हा टप्पा ८ मेपर्यंत सुरू राहील. त्यानंतर ९ मे ते २३मे या कालावधीत बंगळुरू व कोलकाता येथे अखेरचा टप्पा पार पडेल. प्ले ऑफ व फायनल लढत अहमदाबादमध्ये होईल.

    गोलंदाजांवर दबाव

    पंजाब किंग्जसाठी अखेरची लढत महत्त्वाची ठरली. या लढतीत त्यांनी मुंबई इंडियन्सला हरवले होते. या लढतीत कर्णधार लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, ख्रिस गेल व रवी बिश्नोई यांनी धडाकेबाज कामगिरी केली. आता या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी हे खेळाडू उत्सुक असतील. मोहम्मद शमीला मागील लढतीत सूर गवसला असला तरी त्याच्या कामगिरीत सातत्य असायला हवे. मोहम्मद शमी व अर्शदीप सिंग या जोडीवर पंजाब किंग्जच्या गोलंदाजीची मदार आहे.कोलकाता नाइट रायडर्सच्या फलंदाजांकडून सातत्याने निराशा होत आहे. त्यामुळे गोलंदाजांवर दबाव वाढत आहे. पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, प्रसिध कृष्णा, सुनील नारायण, शिवम मावी या सर्व गोलंदाजांना लोकेश राहुलच्या ब्रिगेडला रोखावे लागणार आहे. उद्याच्या लढतीतील विजय कोलकाता नाइट रायडर्सचे मनोबल उंचावू शकतो.