शाहरूख खान प्रिती झिंटाच्या टीममध्ये!

देशांतर्गत स्पर्धेत जोरदार कामगिरी करणाऱ्या शाहरुख खानला किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. त्याची बेस प्राईज ही एकूण २०  लाख होती. मात्र त्यासाठी पंजाबने ५  कोटी २५ लाख मोजले. दरम्यान आता शाहरुख पंजाबकडून खेळताना दिसणार आहे.

    प्रिती झिंटा हिच्या पंजाब संघानं आयपीएलच्या लिलावात शाहरुख खान याला खरेदी केलं आहे. होय… हा कोणी अभिनेता नव्हे तर एक क्रिकेटपटू आहे. देशांतर्गत स्पर्धेत जोरदार कामगिरी करणाऱ्या तामिळनाडूचा अष्टपैली शाहरुख खान याला प्रिती झिंटाच्या पंजाब संघाने आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं आहे. एकही इंटरनॅशनल मॅच न खेळलेल्या पण तामिलनाडू प्रिमियर लीगमध्ये मॅच फिनिशर म्हणून समोर आलेल्या शाहरुख खानला पंजाबने ५.२५ कोटींना घेतले. बेस प्राइस २० लाख. म्हणजे २६ पटींपेक्षा जास्त पैसा मोजला.

    देशांतर्गत स्पर्धेत जोरदार कामगिरी करणाऱ्या शाहरुख खानला किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. त्याची बेस प्राईज ही एकूण २०  लाख होती. मात्र त्यासाठी पंजाबने ५  कोटी २५ लाख मोजले. दरम्यान आता शाहरुख पंजाबकडून खेळताना दिसणार आहे.

    पंजाब आणि आरसीबीने लावलेली बोली

    पंजबा आणि आरसीबी या दोन्ही संघानं शाहरुख खान साठी मोठी बोली लावली. मात्र, प्रितीच्या पंजाब संघानं ही बोली जिंकली.  नुकत्याच झालेल्या मुश्ताक अली स्पर्धेत तामिळनाडूचा Uncapped शाहरुख खानच्या कामगिरीनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं होतं.