आयपीएलची व्हीआय कंपनी बनली को-स्पॉन्सर, मिळाले लाईव्ह ब्रॉडकास्ट स्पॉन्सरशिप राइटस

वोडाफोन आणि आयडीया या कंपनीचा आयपीएल क्रिकेट टूर्नामेंटमध्ये याआधीही काहीना काही सहभाग राहिला आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये पहिल्यांदा वोडाफोन आयडिया कंपनी एकत्र आल्यानंतर २०१८ मध्ये पहिल्यांदाच वोडाफोन आयडिया कंपनी एकत्र आल्यानंतर स्पॉन्सरशिप डील साईन केली आहे.

मंबई : टेलिकॉम ऑपरेटर कंपनी वोडाफोन-आयडिया (व्हिआय) ड्रीम ११ यंदाच्या आयपीएलची  (IPL) को-स्पॉन्सर बनली आहे. आयपीएलची सुरुवात १९ सप्टेंबरपासून यूएई येथे होणार आहे. ही माहिती कंपनीने एका प्रेस रिलीजद्वारे दिली आहे. वोडाफोन आणि आयडीया (VI company) या कंपनीचा आयपीएल क्रिकेट टूर्नामेंटमध्ये याआधीही काहीना काही सहभाग राहिला आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये पहिल्यांदा वोडाफोन आयडिया कंपनी एकत्र आल्यानंतर २०१८ मध्ये पहिल्यांदाच वोडाफोन आयडिया कंपनी एकत्र आल्यानंतर स्पॉन्सरशिप डील साईन केली आहे. ही कंपनी आता व्हीआय ब्रांड खाली ऑपरेट होत आहे. व्हीआयला टी-२० प्रीमियर लीगच्या लाईव्ह ब्रॉडकास्टची को-स्पॉन्सरशिप (live broadcast sponsorship) राइट्सदेखील मिळाल्या आहेत.

ड्रीम ११ टायटल स्पॉन्सरशिप

ड्रीम ११ आयपीएलचे आयोजन यूएईमध्ये होत असून याचे प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. ड्रीम ११ ने २२२ कोटी रुपयांमध्ये यंदाच्या आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवली होती. याआधी भारत आणि चीन यांच्यातील तणावामुळे विवोला स्पॉन्सरशिप देण्यास विरोध होत होता. त्यामुळे बीसीसीआयने यंदा ड्रीम ११ या कंपनीला आयपीएलचे टायटल स्पॉन्सरशिप दिले आङे. सध्या व्हीआयने स्टार स्पोर्ट्सह को-स्पॉन्सर डीलबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मागील आठवड्यात सोमवारी वोडाफोन-आयडीयाने भारतात आपली नवी ओळख जाहीर केली होती. व्हीआय कंपनीचे भारतात जवळपास २८० मिलीयन सब्सक्राइबर्स आहेत.