कांगारूंचा क्लीन स्वीप टळला ! टी-20 मालिकेच्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची बाजी ; भारताने २-१ ने मालिका जिकली

ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा तिसरा आणि अंतिम सामना सिडनी येथे खेळला गेला. या अंतिम सामन्यात कांगारू संघाने बाजी मारली आणि भारताविरुद्ध टी-20 मालिकेत क्लीन स्वीप टाळत १२ धावांनी विजय मिळवला.

ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा तिसरा आणि अंतिम सामना सिडनी येथे खेळला गेला. या अंतिम सामन्यात कांगारू संघाने बाजी मारली आणि भारताविरुद्ध टी-20 मालिकेत क्लीन स्वीप टाळत १२ धावांनी विजय मिळवला. १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची आक्रमक खेळी केली. परंतू दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारताने मालिका २-१ ने जिंकली.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत भारताची सुरुवात खराब झाली. पहिल्याच चेंडूवर मॅक्सवेलने केएल राहुलला माघारी धाडलं. त्यानंतर धवन आणि विराटने डाव सांभाळला. पण,ही जोडी खूप वेळ मैदानावर जम बसवू शकली नाही. धवनला डॅनियल सॅम्सकडे सीमारेषेवर झेलबाद केले. यादरम्यान ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत विराटने अर्धशतकी खेळी केली आणि ऑस्ट्रेलियात ३ हजार धावांचा टप्पा पूर्ण गाठला. श्रेयस अय्यरही शून्यावर माघारी परतला. भारताचा कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची आक्रमक खेळी केली. परंतू दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

पहिले फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासाठी मॅथ्यू वेडने ८० तर मॅक्सवेलने ५४ धावांची खेळी करत टीमला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. कर्णधार आरोन फिंच शून्यावर बाद झाला. वेड आणि स्टिव्ह स्मिथ यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. त्यानंतर, वेडने आपली फटकेबाजी सुरु ठेवत अर्धशतक झळकावल. मॅक्सवेलने आपल्याला मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेत काही मोठे फटके खेळले आणि वेडला साजेशी साथ दिली. वेड आणि मॅक्सवेलमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी झाली. दुसरीकडे, भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने २ तर टी नटराजन आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.