आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब येणार आमनेसामने

दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab Vs Delhi Capitals ) यांच्यात दुसरी लढत होणार आहे. तसेच हा सामना आज संध्याकाळी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता होणार आहे. या दोन्ही संघांना आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवले नाही. त्यामुळे दोन्ही संघ यावर्षी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील.

आयपीएलच्या १३ व्या हंगामाला (IPL 2020) काल शनिवारपासून (Saturday) सुरूवात झाली असून आज आयपीएलचा दुसरा सामना (Second IPL match) आबुधाबीमध्ये होणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab Vs Delhi Capitals ) यांच्यात दुसरी लढत होणार आहे. तसेच हा सामना आज संध्याकाळी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता होणार आहे. या दोन्ही संघांना आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवले नाही. त्यामुळे दोन्ही संघ यावर्षी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील.

या वर्षी पंजाबचे नेतृत्व केएल राहुल करणार आहे. तर दिल्लीचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे असणार आहे. हे दोन्ही नवे कर्णधार आहेत आणि या वर्षी काय प्रयोग करतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्याचप्रमाणे एक महत्त्वाची बाब म्हणजे या दोघांकडे भविष्यातील भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. फक्त कर्णधार नाही तर दोन्ही संघांचे कोच देखील या वर्षी चर्चेत आहेत. पंजाबला अनिल कुंबळेचे तर दिल्लीला रिकी पॉटिंगचे मार्गदर्शन असणार आहे.

दोन्ही संघात मोठे शॉट खेळणारे खेळाडू आहेत. पण युएईमधील धीम्या खेळपट्टीवर अश्विन, मिश्रा आणि अक्षर ही जोडी पंजाबवर नियंत्रण ठेवू शकते. तर दिल्ली संघात पृथ्वी शॉ, अय्यर, ऋषभ पंत, शिखर धवन, शिमरोन हेटमायर असे आक्रमक फलंदाज आहेत.