Kolkata is followed by Chennai's 3 member Corona Positive

देशात सध्या इंडियन प्रीमीयर लीग 2021 चा धुम सुरु आहे. मात्र, इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनला कोरोनाचे ग्रहण लागले आहे. कोलकातापाठोपाठ चेन्नईचे 3 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे सगळ्यांचेच टेन्शन वाढले आहे.

    दिल्ली : देशात सध्या इंडियन प्रीमीयर लीग 2021 चा धुम सुरु आहे. मात्र, इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनला कोरोनाचे ग्रहण लागले आहे. कोलकातापाठोपाठ चेन्नईचे 3 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे सगळ्यांचेच टेन्शन वाढले आहे.

    कोलकत्ताप्रमाणे चैन्नईच्या प्लेअर्सनाही कोरोनाची लागण झाली आहे. चैन्नईचे बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजी यांच्यासह दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे किंग्ज इलेव्हन पंजाबचा एक प्लेअरही कोरोनाबाधित असल्याचे समजते.

    सध्या संपूर्ण चेन्नई संघ दिल्लीतच आहे. संघातील उर्वरित सदस्यांची टेस्ट केली असता त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी सर्वांची कोव्हीड टेस्ट करण्यात आली.
    विश्वनाथन, बालाजी आणि संघाच्या देखभाल करणाऱ्या टीममधील सदस्याची पुन्हा सोमवारी सकाळी पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला तर त्यांना दहा दिवसांसाठी बायोबबलमधून बाहेर जाऊन क्वारंटाईन रहावे लागू शकते. दोन निगेटिव्ह अहवाल आल्यानंतरच पुन्हा संघाच्या बायोबबलमध्ये प्रवेश मिळेल. दरम्यान, कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर हे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.