भारतीय संघासाठी महेंद्रसिंह धोनी बजावणार ‘ही’ भूमिका; बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचा Twitter वर खुलासा

यंदाच्या टी -२० विश्वचषकामध्ये धोनी भारतीय संघाचा मेंटॉर अर्थात मार्गदर्शक म्हणून संघासोबत असेल, असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जाहीर केलं आहे.

    भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतीच टी -२० विश्वचषकासाठीच्या टीम इंडियाची घोषणा केली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृनावाखाली १५ खेळाडूंचा संघ टी -२०वर्ल्ड कप खेळणार आहेत. ओमान आणि यूएईमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल म्हणून ख्याती असणारा महेंद्रसिंह धोनी देखील भारतीय संघासोबत असणार आहे.

    भारताला दोन वेळा विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी भारतीय टीमसोबत वर्ल्डकपमध्ये असणार आहे.

    बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी संघ निवडीनंतर ट्विटरवर धोनीच्या सहभागाची घोषणा केली, ते म्हणाले “यासाठी आम्ही धोनी, कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि संपूर्ण संघ व्यवस्थापनाशी बोललो आहोत आणि सर्वांनी याबद्दल सहमती दर्शवली आहे”. “धोनीसोबत मी दुबईत बोललो. त्याने फक्त टी -२० विश्वचषकासाठी मार्गदर्शक होण्याचे मान्य केले आणि मी माझ्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा केली. प्रत्येकजण यावर सहमत आहे,” असे जय शाह यांनी सांगितले.