Mumbai, Mumbai ... wash away Chennai; Mumbai Indians won by four wickets

आयपीएलमध्ये (IPL 2021) आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) या दोन चॅम्पियन टीममध्ये महामुकाबला झाला. या सामन्यात चेन्नईचा धुव्वा उडवत मुंबई इंडियन्सने चार विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.

    नवी दिल्ली : आयपीएलमध्ये (IPL 2021) आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) या दोन चॅम्पियन टीममध्ये महामुकाबला झाला. या सामन्यात चेन्नईचा धुव्वा उडवत मुंबई इंडियन्सने चार विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.

    मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. मुंबईच्या ट्रेंट बोल्टने चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला पहिल्याच षटकात ४ धावांवर बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. मात्र, त्यानंतर फाफ ड्युप्लेसिस आणि मोईन अलीने आक्रमक फलंदाजी करत चेन्नईला दमदार सुरुवात करुन दिली. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये सीएसकेला ४९ धावांपर्यंत पोहचवले. अखेरीस चेन्नईने मुंबईला २१८ धावांचं टार्गेट दिले.

    मुंबईने हे टार्गेट पूर्ण करत या महामुकाबल्यात चेन्नईचा चार विकेट्सने पराभव केला. कायरन पोलार्डच्या वादळी खेळीने चेन्नईचा धुवा उडवला. ३४ चेंडूत नाबाद ८७ धावांची तुफान खेळी करत पोलार्डने मुंबईला दणदणीत विजय मिळवून दिला. मुंबई इंडियन्सकडून क्विंटन डी कॉक यानं ३८ धावांचं, तर कर्णधार रोहित शर्मा यानं ३५ धावांची भागीदारी केली. कृणाल पंड्यानं पोलार्डला चांगली साथ देत विजयी खेळी केली. हार्दिक पंड्यानं ७ चेंडूत १६ धावा काढल्या.