मुंबई रणजी विरूद्ध ओमान संघाच्या सामन्याला आजपासून सुरवात ..

ओमान संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी संघाला सराव सामने खेळायचे आहेत. म्हणून ओमानच्या क्रिकेट संघाने मायदेशात तीन एकदिवसीय आणि दोन टी-२० सामने खेळण्यासाठी मुंबईच्या संघाला आमंत्रित केले आहे.

    ओमानला पोहोचलेला मुंबईचा वरिष्ठ रणजी संघ टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी १:३० वाजता सुरु होणार आहे. शम्स मुलानी यांच्या नेतृत्वाखाली शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल, मोहित अवस्थी इत्यादी खेळाडूंचा या संघात समावेश आहे.  ओसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) दुलीप मेंडिस यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) सचिव संजय नाईक यांना हे आमंत्रण पाठवले होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आमंत्रण स्वीकारले होते.

     

    ओमान संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी संघाला सराव सामने खेळायचे आहेत. म्हणून ओमानच्या क्रिकेट संघाने मायदेशात तीन एकदिवसीय आणि दोन टी-२० सामने खेळण्यासाठी मुंबईच्या संघाला आमंत्रित केले आहे. ओमान संघ टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात सहभागी होणार आहे. ओमानच्या राष्ट्रीय संघाला सरावाची आवश्यकता असल्याने त्यांच्या सरावासाठी ही व्यवस्था केली गेली आहे. ओमान क्रिकेटचे प्रमुख पंकज खिमजी यांनी मुंबईच्या संघाला आपल्या देशात आमंत्रित करण्यासाठी पुढाकार घेतला होता.