श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री यांच्या ”त्या” दाव्याचा कुमार संगाकाराने घेतला असा समाचार…

श्रीलंकेचे माजी क्रीडा मंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी २०११ साली मुंबईतील वानखेडे मैदानात झालेला भारत आणि श्रीलंका यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या

 श्रीलंकेचे माजी क्रीडा मंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी २०११ साली मुंबईतील वानखेडे मैदानात झालेला भारत आणि श्रीलंका यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर श्रीलंका आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. परंतु श्रीलंकेचे दोन क्रिकेटपटू महेला जयवर्धने आणि कुमार संगाकारा यांनी त्यांच्या या दाव्याबाबत ट्विट करून समाचार घेतला  आहे. २०११च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा श्रीलंकेचा अनुभवी माजी खेळाडू महेला जयवर्धने याने सामना फिक्सींग बाबत खिल्ली उडवली आहे. तसेच श्रीलंकेच कर्णधार कुमार संगाकारा याने देखील आपलं मत टविटच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. 

 संगकाराने यासंदर्भात एक ट्विट केले असून, त्याने आपल्या ट्विटमध्ये सामना फिक्स असल्याचा दावा केल्यानंतर तो खरा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांना पुराव्यांची गरज भासेल. याबाबत सुरक्षा यंत्रणा, लाचलुचपच प्रतिबंधक विभाग आणि आयसीसी हे सारे पुरावा दिल्यानंतरच नीट चौकशी व तपास करू शकतात, असे म्हटले आहे. त्यानंतर माजी क्रीडामंत्र्यांचा हा दावा महेला जयवर्धनेने देखील खोडून काढत खोचक ट्विट केले होते. निवडणुका जवळ आल्या आहेत असं वाटते आणि देशात सर्कस सुरु झाल्यासारखे वाटते. पण नावे आणि पुरावे कुठे आहेत, अशा प्रकारचं ट्विट करत माजी क्रीडामंत्र्यांच्या आरोपांवर श्रीलंकेच्या या दोन्ही क्रिकेटपटूंनी  आपली प्रतिक्रिया दिली आहे.