राहुल द्रविड नव्हे तर ‘हे’ होणार भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक?

कर्णधार विराट कोहली याच्यासह बीसीसीआयचे पदाधिकारी तसेच निवड समितीचे सगळे सदस्य राठोड यांच्याबाबत अनुकुल आहेत

    टी- २० विश्वकरंडक (T20 World Cup)स्पर्धेनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी(Coach of Indian cricket team) असलेल्या रवी शास्त्री यांचा करार संपत आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रवी शास्त्री यांच्यानंतर प्रशिक्षकपदी राहुल द्रविडचे(Rahul Dravid) नाव चर्चेत असतानाच आता नव्याने माजी कसोटीपटू विक्रम राठोड (Vikram Rathod) यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

    सध्या राठोड हे भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत. तर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालक (एनसीए) पदाची मुदत संपल्यानंतर द्रविड यांनीच पुन्हा अर्ज दाखल केल्याने त्यांचे नाव या चर्चेतून बाद झाले. त्याचवेळी कर्णधार विराट कोहली याच्यासह बीसीसीआयचे पदाधिकारी तसेच निवड समितीचे सगळे सदस्य राठोड यांच्याबाबत अनुकुल असल्याचे सांगितले जात आहे. आयसीसी टी-२० क्रिकेट विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर शास्त्री यांच्यासह संपूर्ण सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ संपत आहे.