चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच पंड्या, चहल, गौतम परंतु शकणार मायदेशी

या तिघांनाही श्रीलंका सरकारने तातडीने मायदेशी परतण्यास मनाई केली आहे. त्यांची सातत्याने चाचणी करण्यात येणार असून, जर या चाचणीत ते निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले तरच त्यांना भारतात परतता येणार आहे.

    कोलंबो: श्रीलंकेविरोधात सुरु असलेल्या एकदिवशीय सामन्या दरम्यान कोरोनाची लागण झालेल्या व सद्यस्थितीला विलगीकरणात असलेल्या कृणाल पंड्या, यजुवेंद्र चहल व कृष्णाप्पा गौतम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या तिघांनाही श्रीलंका सरकारने तातडीने मायदेशी परतण्यास मनाई केली आहे. त्यांची सातत्याने चाचणी करण्यात येणार असून, जर या चाचणीत ते निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले तरच त्यांना भारतात परतता येणार आहे. मात्र, त्यांची चाचणी पॉझिटिव्ह असेल तर त्यांना विलगीकरणाचा पूर्ण कालावधी पूर्ण केल्यावर तसेच पुन्हा चाचणी करत अहवाल पाहिल्यावरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही श्रीलंका सरकारने स्पष्ट केले आहे.

    मात्र यामुळे भारताला टी-२० सामन्यांची मालिका गमवावी लागली. दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी पंड्याला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या भारताच्या आठ खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले होते.