rishabh pant

न्यूझीलंडचे गोलंदाजीचे प्रशिक्षक शेन जुरगेंसेन यांनी टीम इंडियाचा धडाकेबाज विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतवर स्तुतीसुमने उधळली आहेत. आमच्या संघाला फायनल मॅचमध्ये भारताचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतपासून सावध रहावे लागले, असे ते म्हणाले. पंत धोकादायक खेळाडू आहे. तो एकटा सामन्याची दिशा बदलवू शकतो. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध त्याने कशा पद्धतीने कामगिरी केली होती. पंत हा खुप सकारात्मक विचार करणारा खेळाडू आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मत व्यक्त केले. दरम्यान, आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी या सामन्याबाबत चाहत्यांची उत्कंठा वाढू लागली आहे.

    लंडन : न्यूझीलंडचे गोलंदाजीचे प्रशिक्षक शेन जुरगेंसेन यांनी टीम इंडियाचा धडाकेबाज विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतवर स्तुतीसुमने उधळली आहेत. आमच्या संघाला फायनल मॅचमध्ये भारताचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतपासून सावध रहावे लागले, असे ते म्हणाले. पंत धोकादायक खेळाडू आहे. तो एकटा सामन्याची दिशा बदलवू शकतो. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध त्याने कशा पद्धतीने कामगिरी केली होती. पंत हा खुप सकारात्मक विचार करणारा खेळाडू आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मत व्यक्त केले. दरम्यान, आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी या सामन्याबाबत चाहत्यांची उत्कंठा वाढू लागली आहे.

    भारतीय गोलंदाजीला धार

    शेन जुरगेंसेन म्हणाले, पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली होती. भारताच्या विजयात त्याची महत्त्वाची भूमिका होती. पंतने या वर्षी खेळलेल्या 6 कसोटी सामन्यात 64.37 च्या सरासरीने ५१५ धावा केल्या आहेत. आमच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागले आणि संयम ठेवावा लागले. पंतला अधिक धावा करण्यापासून रोखण्याचे आव्हान असेल. पंतला थांबवणे सोपे असणार नाही आणि ही गोष्ट आम्हाला लक्षात ठेवावे लागले. भारतीय गोलंदाजी देखील आक्रमक आहे. ती आमच्यासाठी आव्हानात्मक असेल. गोलंदाजीत त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत. जसप्रीत बुमराह पासून ते शार्दुल ठाकूरच्या आव्हानांचा सामना आम्हाला करायचा आहे. त्याच बरोबर मोहम्मद सिराज आणि फिरकी गोलंदाज देखील आहेत.

    किवी संघ इंग्लंडमध्ये दाखल

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून साउथहॅम्पटन येथे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या लढतीकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाची नजर आहे. दोन्ही देशातील खेळांडूसह प्रशिक्षकही ही गोष्ट ध्यानात ठेवून प्रतिस्पर्धी संघाबाबत विधाने करताना दिसत आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या या मॅचच्या आधी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. कर्णधार केन विलियमसनसह आयपीएलच्या 14व्या हंगामात भाग घेतलेले सर्व न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सराव सुरू केला आहे. यात विलियमसनसह कायले जेमीसन, मिचेल सेंटनर, संघाचे फिजिओ टॉमी सिमसेक, प्रशिक्षक ख्रिस डोनाल्डसन यांचा समावेश आहे.