भारतीय नव्हे तर वेस्टइंडीजच्या ‘या’ खेळाडू सोबत होतेय रोहितच्या शतकाची तुलना

रोहित शर्माने आतापर्यंत सर्व फॉरमॅटमध्ये मिळून १० वेळा शतक आणि द्विशतक सिक्स लगावत पूर्ण केले आहे. कोणताही भारतीय बॅट्समन त्याच्या जवळपास नाही. सचिनने ६  वेळा ही कामगिरी केलीय. पण त्याने ही सर्व शतके टेस्ट क्रिकेटमध्ये झळकावली आहेत.

    भारत विरुद्ध इंग्लडच्या चौथ्या कसोटी सामन्यात (India vs England, 4th Test) तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. या दिवसाच्या अखेरीस भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये ३आऊट २७० पर्यंत मजल मारली आहे. मात्र या सामन्यात सर्वाधिक चर्चा झाली ओपनिंग बॅट्समन रोहित शर्माची. रोहित शर्मानं विदेशामध्ये कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक हे सिक्स लगावत पूर्ण केले.

    रोहितच्या नावावर इंग्लंडमध्ये ९ शतके आहेत. याआधी राहुल द्रविडच्या नावावर इंग्लंडमध्ये ८ शतकं होती. रोहितने इंग्लंडमध्ये ९ शतके करण्याच्या व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रिचर्ड्स यांच्या नावावर वनडे आणि टेस्टमध्ये इंग्लंडमध्ये ९ शतके आहेत. आता रोहित पुढे फक्त डॉन ब्रॅडमन आहेत, ज्यांनी इंग्लंडमध्ये ११ शतकं केली.

    रोहित शर्माने आतापर्यंत सर्व फॉरमॅटमध्ये मिळून १० वेळा शतक आणि द्विशतक सिक्स लगावत पूर्ण केले आहे. कोणताही भारतीय बॅट्समन त्याच्या जवळपास नाही. सचिनने ६  वेळा ही कामगिरी केलीय. पण त्याने ही सर्व शतके टेस्ट क्रिकेटमध्ये झळकावली आहेत. सेहवागने त्रिशतक सिक्स लगावत पूर्ण केलेय . टेस्ट क्रिकेटचा विचार केला तर रोहितनं तीन वेळा सिक्स लगावत शतक झळकावले आहे. तर गौतम गंभीर आणि ऋषभ पंतने ही कामगिरी प्रत्येकी २ वेळा केली आहे. रोहित शर्मा इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतके करणारा भारतीय खेळाडू बनला आहे.