… अयो हुबेहूब मुलीधरनंचा मुलगाही करतो बापसारखीच बॉलिंग

मुरलीधरनचा मुलगा नरेन ही वडिलांच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये नरेन नेट्समध्ये बॉलिंग करताना खासशैलीही हुबेहूब मुरलीधरनसारखी असल्याची दिसून आली आहे.

    क्रिकेट  जगतात ‘ऑल टाईम ग्रेट’ बॉलर म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत मुलीधरनंन(Mulidharan) १३३ टेस्टमध्ये २२.७ च्या सरासरीनं ८०० विकेट्स घेतल्याची रेकॉर्ड आहे. इतकाच नव्हेतर त्यांच्या नावावर ५३४ वन-डे आणि १३ टी २० विकेट्स आहेत. मुरलीधरन वन-डे व टेस्टमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा बॉलर आहे. यासगळ्यापेक्षाही मुरलीधरन हा त्याच्या क्रिकेट खेळण्याच्या खास शैलीसाठी ओळखला जातो. अनेक दिग्गज बॅट्समनना स्पिनच्या तालावर नाचवले होते. पण आता मुरलीधरनचा मुलगा नरेन ही वडिलांच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये नरेन नेट्समध्ये बॉलिंग करताना खासशैलीही हुबेहूब मुरलीधरनसारखी असल्याची दिसून आली आहे.

    मुरलीधनरनं १९९२ ते २०११ या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. तो १९९६ साली वर्ल्ड कप जिंकणाऱ्या श्रीलंका टीमचा सदस्य होता. त्याने फायनलमध्ये १० ओव्हरमध्ये ३१ रन देत १ विकेट घेतली होती. त्यानंतर मुरली २००७ व २०११ च्या वर्ल्ड कप फायनलमध्येही खेळला. २०११ वर्ल्ड कपची फायनल ही त्याच्या वन-डे करियरमधील शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच होती. त्या फायनलमध्ये मुरलीनं ८ ओव्हरमध्ये ३९ रन दिले. पण, त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.