‘तुमच्या परिवाराचे या महामारीपासून संरक्षण करा’ असे सांगत ; ‘या’ क्रिकेटरच्या पत्नीने दिली कुटुंबातील १० सदस्यांना संसर्ग झाल्याची माहिती

मागच्या आठवडाभरात घरातील ६ मोठ्या आणि ४ लहान सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. हे सर्व जण वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होते. मागचा आठवडा हे एक वाईट स्वप्न होते. आमच्या तीन पालकांपैकी एक जण आता घरी परतले आहेत. मागचा आठवडा हे एक वाईट स्वप्न होते- प्रीती नारायण

    चेन्नई: टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याच्या घरातील जवळपास १० लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अश्विनची पत्नी प्रीती नारायण हिनं ट्विट करुन घरातील परिस्थितीची सविस्तर माहिती दिली आहे. कोरोनाशी लढणाऱ्या परिवाराला मदत करण्यासाठी आयपीएलमधून माघार घेतली आहे.

    ‘मागच्या आठवडाभरात घरातील ६ मोठ्या आणि ४ लहान सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. हे सर्व जण वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होते. मागचा आठवडा हे एक वाईट स्वप्न होते. आमच्या तीन पालकांपैकी एक जण आता घरी परतले आहेत. सर्वांनी लसीकरण करुन घ्या. तुमचे आणि तुमच्या परिवाराचे या महामारीपासून संरक्षण करा.’ असे प्रितीने म्हटले आहे.

    सनरायझर्स हैदराबाद विरुद्धची मॅच झाल्यानंतर अश्विननं आपीएलमधून माघार घेण्याची घोषणा केली होती. कुटुंबातील काही जणांना कोरोनाची  बाधा झाली असल्याची माहितीही त्याने दिली आहे. अश्विनने ट्विटमध्ये म्हटले की, मी आयपीएलमधून माघार घेत आहे. माझ्या कुटुंबातील स सदस्यांना सध्या कोविड 19 विषाणूशी संसर्ग झाला आहे. त्यामुळे या कठीण काळात मला त्यांच्यासोबत राहणे आवश्यक आहे. सर्व गोष्टी पहिल्यासारख्या झाल्या तर मी पुन्हा आयपीएल खेळेल असे अश्विनने स्पष्ट केले होते.