धक्कादायक! पाकिस्तानच्या ”या” ३ खेळाडूंना कोरोनाची लागण

संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्याआधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने

 संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्याआधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी केली होती. ज्यामध्ये तीन खेळाडूंचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या तीन खेळाडूंमध्ये शादाब खान , हैदर अली, आणि हारीस रौफ अशी नावे आहेत.   

२४ जून रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २९ जणांच्या संघाची घोषणा केली होती. ज्यात काही राखीव खेळाडूंना जागा देण्यात आली होती. इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानी संघ ३ कसोटी आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. दरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली होती. परंतु आता पाक संघातील सर्व खेळाडूंना दौऱ्यावर रवाना होण्याआधीच तीन खेळाडूंना कोरोनाचे लागण झाली असून, या तीन खेळाडूंव्यतिरीक्त इमाद वासिम, उस्मान यांचीही मागील आठवड्यातील शनिवारी रावळपिंडी येखे चाचणी घेण्यात आली होती.