भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया डे-नाईट सामन्यात स्मृती मंधानाने ठोकले शतक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया डे-नाईट सामन्यात भारताची स्मृती मंधानाने शतक(century) झळकवले आहे. हा सामना पिंक बाॅलने खेळला जात आहे. पिंक बाॅल कसोटी सामन्यात शतक झळकवणारी स्मृती ही पहिली भारतीय क्रिकेटपटू बनली आहे.

    मुंबई: क्रिकेटप्रेमींमध्ये सध्या आयपीएलच्या थराराचा माहोल रंगलेला असताना दुसरीकडे भारतीय महिला क्रिकेट संघ डे-नाईट कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या चालू असलेल्या डे-नाईट कसोटी (India and Australia Day-Night Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय महिला संघाने चांगली कामगिरी बजावली असून या सामन्यात स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया डे-नाईट सामन्यात भारताची स्मृती मंधानाने शतक(century) झळकवले आहे. हा सामना पिंक बाॅलने खेळला जात आहे. पिंक बाॅल कसोटी सामन्यात शतक झळकवणारी स्मृती ही पहिली भारतीय क्रिकेटपटू बनली आहे. त्यामुळे सध्या स्मृतीवर कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे.

    पाऊस सुरु असल्यामुळे कालचा सामना लवकर संपवण्यात आला. त्यामुळे स्मृतीला शतक साजरे करण्यासाठी आणखी एक दिवसाची प्रतिक्षा करावी लागली. तिने १७० चेंडूत १८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने हे ऐतिहासिक शतक ठोकले आहे. दरम्यान, पिंक बाॅल कसोटीत शतक झळकवणारी विराट कोहलीनंतर मंधाना दुसरी क्रिकेटपटू आहे.