Team India kept the shame; In the third ODI, Australia lost

कॅनबेरा : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. मागील सहा सामन्यांमध्ये टीम इंडियाने हा पहिला विजय मिळवला आहे. टीम इंडियाने  दिलेले ३०३ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलवता आले नाही. भारताने या सामन्यात १३ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

नाणेफेक जिंकत टीम इंडियने  प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ३०२ धावांचे लक्ष्य टीम इंडियाने  ऑस्ट्रेलियाला दिले.  कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा यांनी अर्धशतकी खेळी करत विजयी धावसंख्येचा डोंगर उभा केला.

विराट बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा यांनी संघाला ३०२ धावांपर्यंत मजल मारून दिली. हार्दिकने मालिकेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या पाठोपाठ जडेजाने देखील अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. त्यांनी नाबाद १५० धावांची भागिदारी केली.

ऑस्ट्रेलियाला हा ३०३ धावांचा टप्पा पार करता आला नाही. ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज झटपट बाद झाले. मात्र, कर्णधार आरोन फिंचने डाव सावरण्याचा प्रयत्न करत आपले अर्धशतक झळकावले. तो शतकाच्या दिशेने कूच करत असतानाच  शिखर धवने त्याला झेलबाद केले. यानंतर मैदानात उतरलेले गडीही विजयी धावसंख्येचा आकडा गाठू शकले नाहीत.