लॉकडाऊननंतर टीम इंडियाच्या जर्सीत बदल होण्याची शक्यता ?

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे टीम इंडियाला आणि बीसीसीआयला मोठा फटका बसला आहे. तसेच बीसीसीआयने यंदाचा तेरावा हंगाम रंग केल्यास, बीसीसीआयला चार हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. बीसीसीआय

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे टीम इंडियाला आणि बीसीसीआयला मोठा फटका बसला आहे. तसेच बीसीसीआयने यंदाचा तेरावा हंगाम रंग केल्यास, बीसीसीआयला चार हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. बीसीसीआय आणि टीम इंडियाची कीट पार्टनर असलेली कंपनी नाईकी यांच्यात कराराच्या नुतनीकरणावरुन सध्या रस्सीखेच सुरु आहे.

लॉकडाऊनमध्ये नाईकी कंपनीलाही मोठा फटका बसला आहे, त्यातच सामने होत नसल्यामुळे कंपनीने बीसीसीआयला करार वाढवण्याची विनंती केली आहे.भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या तीन देशांविरुद्धच्या मालिका रद्द केल्या आहेत. २००६ सालापासून बीसीसीआय आणि नाईकी कंपनीमध्ये करार झालेला आहे. परंतू यंदा हा करार न झाल्यास टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.