टीम इंडिया दुसरा सामनाही विजय खेचून आणण्याच्या निर्धारानेच खेळेल

आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात सर्वांचे लक्ष पृथ्वी शॉकडे असेल. दुसऱ्या सामन्यात तो मोठ्या खेळीचा निर्धार करूनच खेळेल, यात शंका नाही. कमी अनुभव असलेल्या भारताच्या संघाने आपल्यातील गुणवत्ता दाखवली असल्याने, यजमान श्रीलंकेला पुनरागमन करण्यासाठी आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

  कोलोंबो: भारताने श्रीलंकेविरूद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० असा जिंकल्यानंतर आज होणाऱ्या दुसऱ्या सामना खेळण्यासाठीही संघ सज्ज झाला आहे. हा सामानाचाही विजय खेचून आणण्याच्या निर्धारानेच खेळला जाईल.
  पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाच्या खेळाडूंनी अपेक्षित कामगिरी केली. ईशान किशन, पृथ्वी शॉ यांनी आक्रमक खेळी करत यजमानांना दबावाखाली ठेवले. त्याचवेळी एक बाजू लावून धरताना कर्णधार शिखर धवनने संयमी खेळीसह लंकेला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संघात बदल होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात सर्वांचे लक्ष पृथ्वी शॉकडे असेल. दुसऱ्या सामन्यात तो मोठ्या खेळीचा निर्धार करूनच खेळेल, यात शंका नाही.
  कमी अनुभव असलेल्या भारताच्या संघाने आपल्यातील गुणवत्ता दाखवली असल्याने, यजमान श्रीलंकेला पुनरागमन करण्यासाठी आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. गोलंदाजांना विशेष घाम गाळावा लागणार असून, फलंदाजांनाही मोठ्या खेळी कराव्या लागतील. पहिल्या सामन्यात लंकेच्या अनेक फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. मात्र, त्यांना मोठी खेळी करण्यात यश आले नाही.

  वेळ: भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता

  भारत – शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, नितीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, कृष्णप्पा गौतम, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, राहुल चाहर, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, चेतन सकारिया, नवदीप सैनी.

  श्रीलंका – दासून शनाका (कर्णधार), धनंजय डिसिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पथूम निसंका, चरित असलंका, वनिंदू हसरंगा, आशेन बंडारा, मिनोद भानुका, लाहिरू उदारा, रमेश मेंडीस, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमिरा, लक्षण संदाकन, अकिला धनंजय, शिरन फर्नांडो, धनंजय लक्षण, इशान जयरत्ने, प्रवीण जयविव्रेमा, असिथा फर्नांडो, कसून रजिता, लाहिरू कुमारा, इसुरू उदाना.