आयपीएल स्पर्धेनंतर टीम इंडियाचा ‘हा’ दिग्गज खेळाडू होणार निवृत्त!

हरभजननं १९९८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ४१ वर्षांचा भज्जी हा इम्रान ताहीर आणि ख्रिस गेल यांच्यानंतरचा आयपीएलमधील तिसऱ्या क्रमांकाचा सिनिअर खेळाडू आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातही हरभजन एक यशस्वी बॉलर आहे. त्यानं १६३ मॅचमध्ये १५० विकेट्स घेतल्या आहेत.तसंच त्याचा इकॉनामी रेट ७.०७ आहे.

    मुंबई : गेली दीड दशकं क्रिकेटचं मैदान गाजवणारा दिग्गज खेळाडू आयपीएल स्पर्धेनंतर निवृत्त होणार आहे. हा खेळाडू ऑफ स्पिनर हरभजन सिंग आहे हरभजननंच त्याच्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या मॅचनंतर बोलताना हरभजननं निवृत्तीचे संकेत दिले.’मला जास्त क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. मी देशांतर्गत क्रिकेटही फारसं खेळत नाही. त्यामुळे मी इथून पुढे खेळणार की नाही हे मला माहिती नाही. पण, मला केकेआर टीममध्ये तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात मजा आली, असे तो म्हणाला.

    अशी आहे कारकीर्द
    हरभजननं १९९८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ४१ वर्षांचा भज्जी हा इम्रान ताहीर आणि ख्रिस गेल यांच्यानंतरचा आयपीएलमधील तिसऱ्या क्रमांकाचा सिनिअर खेळाडू आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातही हरभजन एक यशस्वी बॉलर आहे. त्यानं १६३ मॅचमध्ये १५० विकेट्स घेतल्या आहेत.तसंच त्याचा इकॉनामी रेट ७.०७ आहे. हरभजननं २०१३, २०१५ आणि २०१७ साली मुंबई इंडियन्सकडून आयपीएल स्पर्धा जिंकली होती. त्याशिवाय २०१८ साली आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचाही तो सदस्य होता. हरभजनने आजवर निवृत्तीची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, २०१६नंतर त्यानं टीम इंडियाकडून एकही मॅच खेळलेली नाही. हरभजनचा फ्रेंडशिप हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे.