एकदिवसीय क्रिकेटमध्ये ‘सुपर-ओव्हर’ ही संकल्पना गरजेची नाही – रॉस टेलर

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सुपर-ओव्हर ही संकल्पना गरजेची नाही. तर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत एखादा अंतिम सामना बरोबरीत सुटला तर तो तसाच ठेवण्यात यावा. त्याऐवजी विश्वचषक दोन्ही संघांना विभागून

 एकदिवसीय क्रिकेटमध्ये सुपर-ओव्हर ही संकल्पना गरजेची नाही. तर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत एखादा अंतिम सामना बरोबरीत सुटला तर तो तसाच ठेवण्यात यावा. त्याऐवजी विश्वचषक दोन्ही संघांना विभागून द्यावा, असे मत न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरने व्यक्त केले. फुटबॉल किंवा अन्य खेळांमध्ये अंतिम फेरीचा निकाल पेनल्टी-शूटआऊटद्वारे लावला जातो. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचा कित्ता गिरवण्याची गरज नाही,असे टेलरने सांगितले. 

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना झाला होता. त्यामुळे त्याचा निकाल हा सुपर-ओव्हरमध्येही न लागल्याने, सर्वाधिक चौकार आणि षटकरांच्या नियमाद्वारे इंग्लंडला विजयी म्हणून घोषित करण्यात आले होते. परंतु या सामन्यानंतर आयसीसीवर  कडाडून अशी टीका करण्यात आली होती. त्यानंतर सामन्याचा निकाल लागेपर्यंत सुपर-ओव्हर होईल, असा नियम आयसीसीने केला होता.