आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये केलेल्या बदलांबाबत, या दोन भारतीय खेळाडूंची नाराजी

मुंबई : कोरोनाचा संसर्ग संपूर्ण देशात वाढत आहे. त्यामुळे या कोरोनाचा परिणाम चित्रपट, व्यवसाय , उद्योगधंदे यांबरोबरचं क्रिकेटवरही झाल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने

 मुंबई : कोरोनाचा संसर्ग संपूर्ण देशात वाढत आहे. त्यामुळे या कोरोनाचा परिणाम चित्रपट, व्यवसाय , उद्योगधंदे यांबरोबरचं क्रिकेटवरही झाल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल केल्याची माहिती समोर आली होती. परंतु या नियमांमधील काही बदल हे चुकीचे असल्याचे भारताचे दोन वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल यांनी सांगितले आहे. एखाद्या खेळाडूचा विकेट घेण्यासाठी चेंडूवर लाळ किंवा थुंकी  यांचा वापर करून चेंडू स्विंग करता येतो. तसेच चेंडूची चमक वाढवण्यासाठी सुद्धा या युक्तीचा वापर होतो. परंतु आयसीसीने बदल केलेल्या नियमांनुसार, आता पूर्वीप्रमाणे लाळ किंवा थुंकी यांचा वापर करता येणार नाही. त्यामुळे वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि फिरकीपटू युजवेंद्र चहलने हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटलं आहे.

पाच दिवसीय कसोटी सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज स्विंग करण्यासाठी चेंडूला लाळ लावून चमकवतात. जर असं केलं नाही तर चेंडू स्विंग होणार नाही आणि याचा फायदा हा फलंदाजांना होईल, असं इशांत शर्माने म्हटलं आहे. त्यामुळे स्पर्धा समान असावी, असंही तो म्हणाला.  दरम्यान,  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने क्रिकेटमध्ये नवीन नियम लागू केले आहेत. तसेच हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत.

नियमांनुसार, चेंडूचा वापर हा चमकवण्यासाठी तसेच लाळ किंवा थुंकीचा वापर करू शकतो. परंतु कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, असे केल्यास खेळाडूंना पंचांकडून दोन वेळा इशारा दिला जाईल. तरीही खेळाडूने नियमांचं उल्लंघन केलं तर जो संघ फलंदाजी करत असेल त्या संघाला पाच धावांची पेनल्टी लावली जाणार असल्याचं म्हटलं आहे.