अय्यो!!!  धोनीचा खेळातील ‘या’ शॉट्सचा Video होतोय Viral

महेंद्रसिंह धोनीची आक्रमक बॅटींग बराच काळापासून आयपीएलध्ये दिसलेली नाही. आयपीएल २०२० (IPL 2020) धोनीनं १४ मॅचमध्ये २५ सरासरीनं २०० रन काढले होते. त्याचा स्ट्राईक रेट११६ होता.

    मुंबई: आयपीएल २०२१ च्या (IPL 2021) हंगामास लवकरच सुरुवात होणार आहे. या आयपीएलमधील महेंद्रसिंह धोनीचं वलय आजही तितकेच आहे. त्याची बॅटींग बंद असली तरी आजही त्याची मॅच विनर अशी ओळख आहे. अशातच नुकताच धोनीच्या बॅटींगचा एक व्हिडीओ चेन्नई सुपर किंग्सनं पोस्ट केला आहे. त्यामध्ये जुन्या शैलीमधील धोनी परतलेला दिसत आहे.

    या व्हिडीओमध्ये धोनी यॉर्कर बॉलवर त्याचा ट्रेडमार्क असलेला हेलिकॉप्टर शॉट मारताना दिसत आहे. त्याचबरोबर त्यानं चेन्नईचा फास्ट बॉलर दीपक चहरच्या (Deepak Chahar) बॉलवर कव्हर्सच्या डोक्यावरुन एक जबरदस्त फोर देखील लगावला. धोनी सध्या गेल्या तीन वर्षातील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. तो सध्या मोठे-मोठे सिक्स लगावतोय, असा इशारा चहरनं दिला आहे.

    महेंद्रसिंह धोनीची आक्रमक बॅटींग बराच काळापासून आयपीएलध्ये दिसलेली नाही. आयपीएल २०२० (IPL 2020) धोनीनं १४ मॅचमध्ये २५ सरासरीनं २०० रन काढले होते. त्याचा स्ट्राईक रेट११६ होता. तर या आयपीएलमध्ये त्यानं १२.३३ सरासरीनं ३७ रन काढले आहेत.