“काबूलमध्ये रक्तपात होत आहे,अफगाणांना मारणे थांबवा”  ‘या’ अफगाणी खेळाडूने केले आवाहन

रशीदचे कुटुंब अफगाणिस्तानात आहे. तालिबानच्या हल्ल्यानंतर त्याला त्याच्या कुटुंबाची काळजी वाटत आहे. देशातील परिस्थितीमुळे तो चिंतेत आहे. कारण रशीद आपल्या कुटुंबाला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यास यश येत नाही

    अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावर(Kabul Airport ) गुरुवारी रात्री झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटांमध्ये ९० हून अधिक लोंकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. इतकेच नव्हे तर दोन स्फोटांनंतरही विमानतळावर आणखी हल्ले होण्याची भीती असल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. अशातच अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खानने ट्विट करून अफगाणिस्तानमधील तणावाबाबत आपली निराशा व्यक्त केली आहे.

    रशीदने खान(Rashid Khan) आपलाऊया ट्विटमध्ये वाचल्यावर जे निश्चितच त्याची निराशा कळते. रशीदने लिहिले आहे की, “काबुलमध्ये पुन्हा रक्तपात होत आहे, कृपया अफगाणांना मारणे थांबवा.” रशीदच्या या ट्विटवर सोशल मीडिया वापरकर्ते आपली प्रतिक्रिया देत आहेत.

    रशीद सध्या इंग्लंडमध्ये आहे. सध्या तो टी-२० ब्लास्ट स्पर्धा खेळत आहे. टी-२० ब्लास्ट स्पर्धा खेळल्यानंतर तो आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा खेळण्यासाठी यूएईला जाईल. राशिद खान व्हिसेलिटी ब्लास्टमध्ये ससेक्स संघाकडून खेळत आहे. यॉर्क शायरविरुद्धच्या सामन्यात रशीदने अप्रतिम खेळी खेळली आणि केवळ९ चेंडूत २७ धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानमध्ये तणाव असूनही रशीद त्याच्या खेळामध्ये पूर्ण १०० टक्के देत आहे.

    “रशीदचे कुटुंब अफगाणिस्तानात आहे. तालिबानच्या हल्ल्यानंतर त्याला त्याच्या कुटुंबाची काळजी वाटत आहे. देशातील परिस्थितीमुळे तो चिंतेत आहे. कारण रशीद आपल्या कुटुंबाला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यास यश येत नाही.” इतक्या दबावात राहूनही रशीद खान खेळात आपले १०० देत असल्याचे  इंग्लंडचा  माजी खेळाडू केविन पीटरसन यांनी म्हटले आहे.