धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीत घडलेत हे अविश्वसनिय योगायोग

महेंद्र सिंग धोनीने २००४ ते २०१९ या १५ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले आणि काही अविश्वसनिय योगायोगसुद्धा घडले आहेत. धोनीने २३ डिसेंबर २००४ ला आपल्या वने डे सामन्यातून पदार्पण केले होते. याच पहिल्या वन डे सामन्यात धोनी पहिल्याच चेंडूवर धावबाद झाला होता. तसेच २०१९ साली खेळत असलेल्या अखेरच्या सामन्यातही तो धावबाद झाला होता. त्यामुळे हा योगा योग झाला आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. परंतु या घोषणेमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. धोनीच्या अचानक निवृत्तीने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. धोनीच्या निवृत्तीची चर्चा वारंवार होत असायची; परंतु शनिवारी धोनीने या निवृत्तीच्या चर्चाना अखेर पूर्णविराम दिला आहे. 

महेंद्र सिंग धोनीने २००४ ते २०१९ या १५ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले आणि काही अविश्वसनिय योगायोगसुद्धा घडले आहेत. धोनीने २३ डिसेंबर २००४ ला आपल्या वने डे सामन्यातून पदार्पण केले होते. याच पहिल्या वन डे सामन्यात धोनी पहिल्याच चेंडूवर धावबाद झाला होता. तसेच २०१९ साली खेळत असलेल्या अखेरच्या सामन्यातही तो धावबाद झाला होता. त्यामुळे हा योगा योग झाला आहे. 

तसेच महेंद्रसिंग धोनीने अनेक शतकं केली. पहिले वनडे शतक धोनीने पाचव्या वनडे सामन्यात केले होते. आणि कसोटी सामन्यातही पहिले शतक पाचव्याच सामन्यात केले होते. यामध्ये अविश्वसनिय बाब ही आहे की, ही दोन्ही शतकं पाकिस्तानविरुद्धच केली होती. आणि या दोन सामन्यातील १४८ धावादेखील सारख्याच आहेत. या सामन्यांत दोन्ही वेळेस चार षटकार मारले आहेत. 

वन डे सामन्यात धोनी हा दुसरा शतकवीर यष्टीरक्षक होता. तर राहूल द्रविड वन डे सामन्यातील पहिला शतकवीर यष्टीरक्षक होता. हा देखील एख धोनीच्या क्रिकेटच्या प्रवासातील योगायोग आहेत. राहूल द्रविडने १९९९ ला श्रीलंकेचच्या विरुद्ध विश्वचषक स्पर्धेत १४५ धावांची खेळी केली होती. त्यावेळी द्रविड यष्टीरक्षक होता. 

धोनीने संपूर्ण क्रिकेट कारकिर्दित अनेक विक्रम केले तर काही अविस्मरणीय योगायोग घडवून आणले आहेत. १९९९-२००० मध्ये रणजी सामन्यात आसामच्या पराग दासला दुसऱ्या सामन्यात ३० धावांवर बाद केले होते. त्याच पराग दासच्या मुलगा रियान पराग याला धोनीने १९ वर्षांनंतर ११ एप्रिल २०१९ रोजी आयपीएल सामना खेळताना जयपूर येथे झेलबाद केले होते. यामुळे पिता-पुत्राला देखील खेळबाद करण्याचा योग त्याने साधला आहे. 

तसेच क्रिकेट विश्वातील मैत्री सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी यांनी दोघांनीही एकाच दिवशी निवृत्ती घेतली. ते दोघे आयपीयएलमध्ये एकाच संघात होते. त्याचबरोबर दोघांनीही सोबत निवृत्त घेतली आहे.