जगाच्या पाठीवर वनडेत सर्वाधिक धावा पूर्ण करणारे ३ फलंदाज ?

सुरुवातीच्या काही वर्षांपासूनच वनडे क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाने आपला दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली होती. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे, वनडे विश्वचषकाची सुरुवात झाल्यानंतर तिसऱ्याच

सुरुवातीच्या काही वर्षांपासूनच वनडे क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाने आपला दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली होती. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे, वनडे विश्वचषकाची सुरुवात झाल्यानंतर तिसऱ्याच विश्वचषकावर १९८३  मध्ये भारताने आपल नाव सुवर्ण अक्षरात कोरलं होतं. ९० च्या दशकापासून भारतीय संघाला आजपर्यंत एका पेक्षा एक प्रतिभावान खेळाडू मिळाले आहेत. पण त्यातील ३ फलंदाज असे आहेत ज्यांनी जागतिक स्तरावर वनडेत सर्वात जलद १० हजार धावा करण्याचा पराक्रम केला आहे. याच ३ भारतीय फलंदाजांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

सर्वात पहिले माजी भारतीय कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणानंतर आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला होता. त्यामुळेच गांगुली वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.   

दुसरा क्रिकेटपटू म्हणजे सचिन तेंडुलकर. वनडे क्रिकेट असो किंवा कसोटी क्रिकेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर प्रत्येक जागी उपस्थित असायचा. सचिनने कारकिर्दीत ४६३ वनडे सामन्यात ४९ शतकं आणि ९६ अर्धशतकांसह १८४२६ धावा केल्या आहेत. तर वनडेत नाबाद २०० ही त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या होती. सचिनने आपल्या कारकीर्दीत ६ वनडे विश्वचषक खेळले. ज्यात त्याने २ विश्वचषकाच्या २००३ आणि २०११ अंतिम सामान्यांपर्यंत मजल मारली. पण २०११ साली अंतिम सामन्यात श्रीलंकेला मात देत भारताने विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरलं आणि सचिनचं विश्वचषक जिंकण्याच स्वप्न पूर्ण झालं. शेवटी २३ डिसेंबर २०१२ रोजी त्याने वनडे क्रिकेटला अलविदा केलं. 

 तिसरा वेगवान आणि भारताचा कर्णधार विराट कोहली. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात जलद १० हजार पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. महत्वाचं म्हणजे २०१८ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सामन्यात विशाखापट्टणम येथे त्याने १० हजारावी धाव पूर्ण केली. त्याने फक्त २०५ वनडे डावात हा विक्रम केला आहे.