ajinkya rahane

कसोटीच्या दुसऱ्या डावातही शुन्यावर बाद झालेल्या रहाणेला भारतीय क्रिकेट प्रेमींनी थेट त्याला 'थँक यू' म्हणत ट्रोल केले आहे.

    भारत विरूद्ध इंग्लड कसोटी सामन्यातील असमाधानकारक कामगिरीमुळे कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होतोय. कसोटीच्या दुसऱ्या डावातही शुन्यावर बाद झालेल्या रहाणेला भारतीय क्रिकेट प्रेमींनी थेट त्याला ‘थँक यू’ म्हणत ट्रोल केले आहे.

    लॉर्ड्स कसोटीत ६१ धावांची एक महत्वाची अर्धशतकी खेळी वगळता राहणेला फारशी चमक दाखवता आलेली नाही. मालिकेतील आतापर्यंतच्या ७ डावांत मिळून रहाणेला केवळ १०९ धावाच करता आल्या आहेत. २०१५ मध्ये झालेल्या लॉर्ड्स कसोटीनंतर प्रथमच त्याची सरासरी ४० च्या खाली पोहोचली आहे. दरम्यान, मधल्या फळीत रहाणेच्या अपयशाचा फटका या मालिकेत भारतीय संघाला सातत्याने बसत आहे.

    दरम्यान, आजच्या डावातही शुन्यावर बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. सोशल मीडियावर त्याच्याबाबत मिम्सचा पाऊस पडू लागला आहे.एका युजरने लिहिले की, अजिंक्य रहाणेची कसोटी कारकीर्द पॅव्हेलियनच्या दिशेने परतत आहे. #ThankYouRahane आम्ही तुला मिस करणार नाही. जर रहाणेला पुन्हा संधी मिळाली तर तो करुण नायर सारख्या खेळाडूवर केलेला अन्याय ठरेल.

    माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने रहाणेला दिला सल्ला

    असे प्रत्येक फलंदाजाच्याबाबतीत घडत असतं. माझ्यासोबतपण असे झाले होते तेव्हा सचिन तेंडुलकरने मला एक सल्ला दिला होता. तोच सल्ला मी आज रहाणेला देऊ इच्छितो. मैदानावर अधिक वेळ घालवण्याचा नेहमी प्रयत्न ठेवायचा. असा विचार करायचा की, आपला खेळ आपले आई वडील पाहत आहेत. त्यांच्यासाठी शक्य तितक्या वेळ मैदानावर उभे रहा. भले तुला धावा करता आल्या नाहीत तरी चालतील पण आई वडिलांसाठी तुम्ही मैदानात असणं गरजेंच असते. असा सल्ला सेहवागने रहणेला दिला आहे.