चाहत्यांच्या या ट्रोलिंगवर विराट चांगलाच संतापला; टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. विराट कोहलीने सोशल मीडियावर चाहत्यांसमवेत प्रश्नोत्तराचे सत्र केले होते. यात एका चाहत्याने त्याला त्याच्या डाएट सवयीबद्दल विचारले असता कोहली म्हणाला, की त्याच्या आहारात भाज्या अंडी, 2 कप कॉफी, मसूर, क्विनोआ, पालक, डोसा असतो. पण हे सर्व तो मर्यादित प्रमाणात खातो. विराटने सोशल मीडियावर आपण अंड खातो, असे सांगितल्यानंतर त्याला ट्रोल करायला सुरुवात झाली.

    मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. विराट कोहलीने सोशल मीडियावर चाहत्यांसमवेत प्रश्नोत्तराचे सत्र केले होते. यात एका चाहत्याने त्याला त्याच्या डाएट सवयीबद्दल विचारले असता कोहली म्हणाला, की त्याच्या आहारात भाज्या अंडी, 2 कप कॉफी, मसूर, क्विनोआ, पालक, डोसा असतो. पण हे सर्व तो मर्यादित प्रमाणात खातो. विराटने सोशल मीडियावर आपण अंड खातो, असे सांगितल्यानंतर त्याला ट्रोल करायला सुरुवात झाली.

    विराट स्वत:ला विगन सांगतो, मग तो अंडी कशी खातो? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. चाहत्यांच्या या ट्रोलिंगवर विराट चांगलाच संतापला आणि त्याने प्रत्युत्तरही दिले. मी विगन असल्याचा कधीही दावा केला नाही, पण मी शाकाहारी होण्याबाबत बोललो आहे. दीर्घ श्वास घ्या आणि भाज्या खा (इच्छा असेल तर) असे विराटने ट्विटमध्ये म्हटले आहे. विराटच्या या ट्विटवर चाहते प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. जे लोक आहारात मांस व दुग्धजन्य पदार्थ वापरत नाहीत, त्यांना वीगन म्हणतात.