विराट कोहली ‘या’ कारणासाठी सोडणार कर्णधारपद ; ‘या’ खेळाडूकडे जाणार कर्णधार पदाची धुरा

कोहलीने यासंदर्भात टीम मॅनेजमेंट तसेच रोहितशी बोलले आहे. कोहलीला त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. अशा परिस्थितीत तोही धोनीच्या पावलावर पाऊल टाकेल. फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी धोनीने कसोटी कर्णधारपदही कोहलीकडे सोपवले. आता कोहलीही तेच करणार आहे.

  T- 20 विश्वचषकापूर्वी(T-20 World Cup) रोहित शर्मा वनडे आणि T- 20 संघाचा कर्णधार होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सध्याचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohali)फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी रोहित शर्माकडे (Rohit Sharma) T- 20 आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवू शकतो. तीनही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाच्या दबावामुळे कोहलीच्या फलंदाजीवर परिणाम होत आहे,असे कोहलीला वाटते त्याच्या फलंदाजीला सर्व फॉरमॅटमध्ये अधिक वेळ आणि अधिक वेग आवश्यक आहे. विराट स्वतः याची घोषणा करेल. त्यामुळे विराट बॅटींगवर अधिक फोकस करण्यासाठी हा निर्णय घेऊ शकतो.
  दरम्यान, विराट कोहलीनं गेल्या काही महिन्यांत रोहित शर्मा आणि टीम इंडियाच्या(Team India) प्रशासनाशी दीर्घ काळ चर्चा केली आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष विराटच्या निर्णयाकडे लागली आहे.

  ३२ वर्षीय विराट कोहली, जो सध्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे आणि भारताचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे, त्याने ३४ वर्षीय रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेणार असल्याचे , बीसीसीआय(BCCI) च्या सुत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले आहे.

  बातमीनुसार, कोहलीने यासंदर्भात टीम मॅनेजमेंट तसेच रोहितशी बोलले आहे. कोहलीला त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. अशा परिस्थितीत तोही धोनीच्या पावलावर पाऊल टाकेल. फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी धोनीने कसोटी कर्णधारपदही कोहलीकडे सोपवले. आता कोहलीही तेच करणार आहे. त्याने रोहितसोबत कर्णधारपदाची जबाबदारीची विभागणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  मुंबई इंडियन्सने पाच वेळा पटकावले विजेतेपद
  रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाच वेळा जेतेपद पटकावले आहे. अशा परिस्थितीत कोहलीने कर्णधारपद सोडल्यास रोहितचा दावा मजबूत होईल. रोहित सध्या एकदिवसीय संघाचा उपकर्णधार आहे.