विराट-रोहित बायो-बबलमध्ये; बीसीसीआयचे नियम कडक

बायो बबलमध्ये प्रवेश केलेल्यांना सात दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीत राहावे लागेल. मुंबईतील सदस्यांव्यतिरिक्त इतर खेळाडूंनी १९ मेला आपला क्वारंटाइन कालावधी सुरू केला आहे. त्यामुळे या आठवड्यात बबलमध्ये प्रवेश घेतलेल्या सदस्यांना त्यांची भेट घेणे शक्य होणार नाही. कोणत्याही प्रकारे कोरोनाच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन होणार नाही, याची बीसीसीआय काळजी घेत आहे.

    मुंबई : आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मासह अन्य खेळाडूंनी उशीरा का होईना बायो बबलमध्ये प्रवेश घेतला आहे. विविध गट करून या खेळाडूंनी मुंबईच्या बबलमध्ये एन्ट्री घेतली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, विराट- रोहितने सोमवारी बायो बबलमध्ये प्रवेश केला. टीम इंडिया 2 जूनला इंग्लंडसाठी रवाना होईल.

    बायो बबलमध्ये प्रवेश केलेल्यांना सात दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीत राहावे लागेल. मुंबईतील सदस्यांव्यतिरिक्त इतर खेळाडूंनी १९ मेला आपला क्वारंटाइन कालावधी सुरू केला आहे. त्यामुळे या आठवड्यात बबलमध्ये प्रवेश घेतलेल्या सदस्यांना त्यांची भेट घेणे शक्य होणार नाही. कोणत्याही प्रकारे कोरोनाच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन होणार नाही, याची बीसीसीआय काळजी घेत आहे.

    बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बायो बबलसंदर्भात बरेच नियोजन केले गेले आहे. सोमवारी प्रवेश करणाऱ्या खेळाडूंना कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही. त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केली गेली आहे आणि तेथे ते 7 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करतील. त्यांना थेट संघात येण्याची परवानगी दिली जाणार नाही. विराटसह मुंबईचे खेळाडू आता इंग्लंडला रवाना होण्याच्या दिवशी संघात सामील होतील. त्यांच्यासाठी आवश्यक ती सुविधा त्यांच्या खोलीपर्यंत वाढविण्यात येईल.

    यापूर्वी रवींद्र जडेजाने मुंबईत पोहोचल्यानंतर क्वारंटाइन राहत असल्याची माहिती दिली होती. जडेजाने इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली होती. त्याने त्याचा एक फोटो पोस्ट केला होता. बीसीसीआयने बायो बबलमध्ये राहणाऱ्या खेळाडूंसाठी त्यांच्या रुममध्ये प्रशिक्षणाचीही व्यवस्था केली आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.